मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आपल्या जबरदस्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ते खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सेलेब्रिटी असले तरी ते सामान्य माणसासारखेच राहतात. आपल्या कर्तृत्वानं 'खास' बनल्यानंतरही 'आम' राहण्यात माणसांची खरी कसोटी असते. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी भाजी खरेदीचा अनुभव चाहत्यांसोबतत शेअर केला.
नुकतेच मनोज यांचा 'भैय्याजी' हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मनोज वाजपेयी हे विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज यांना "भाजी खरेदी करताना मोलभाव करता का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, 'आता भाजी विक्रेते मला शिव्या देतात. तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला हे शोभत नाही, असं म्हणतात. माझी बायको तर मला ओळखत नसल्यासारखं वागते. तिला मोलभाव करायाला आवडत नाही'. यासोबतच शाश्वत जीवनशैली स्वीकारली असून किराणा खरेदीसाठी प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या घेऊन जातो, असे मनोज यांनी सांगितलं.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, मनोज वाजपेयींच्या कारकीर्दीतला 'भैय्याजी' हा १०० वा सिनेमा आहे. भैय्याजी' सिनेमा २४ मे २०२४ ला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या देसी ॲक्शन चित्रपटात मनोजने त्याचे ९८% स्टंट स्वतः केले आहेत. 'भैय्याजी' सिनेमाशिवाय मनोज हे 'फॅमिली मॅन 3'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'फॅमिली मॅन 3' च्या शूटींगला सुरुवात झाली आहे. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी यांच्यासह प्रियामणी, शरद केळकर, शारिब हाश्मी हे कलाकारही आहेत.