Join us  

इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 9:21 AM

त्यांचा 'भैय्याजी' हा १०० वा सिनेमा रिलीज झाला. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतींमध्ये मनोज वाजपेयींनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.

मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) इंडस्ट्रीतील अतिशय प्रभावशाली अभिनेते. 'सत्या','गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या सिनेमांमधून त्यांनी छाप पाडली. तर 'गुलमोहर'सारख्या स्थिर सिनेमामध्येही त्यांनी सुंदर काम केले. नुकताच त्यांचा 'भैय्याजी' हा १०० वा सिनेमा रिलीज झाला. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतींमध्ये मनोज वाजपेयींनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. यात त्यांनी इंडस्ट्रीतील घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावरही भाष्य केले. 

एका मुलाखतीत मनोज वाजपेयी म्हणाले, "तुम्ही कौटुंबिक न्यायालयात गेलात आणि घटस्फोटाचा दर विचारलात तर तुमच्या लक्षात येईल की समाज कुठे येऊन पोहोचला आहे. इथे प्रत्येक दिवशी नाती तुटत आहेत, घटस्फोट होत आहे. समाजात आता विभक्त कुटुंब पद्धत रुजू झाली आहे. याचे आपापले फायदे आहेत पण त्यामुळे होणारं नुकसानही आपण कोर्टात पाहत आहोत."

ते पुढे म्हणाले,"इंडस्ट्रीही या समाजाचाच तर भाग आहे. लोक खुल्या विचारांचे झाले आहेत त्यामुळे जो बदल समाजात दिसतोय तोच इंडस्ट्रीतही दिसणार. आधी इथे एवढे घटस्फोट व्हायचे नाहीत जितके आज होत आहेत. पण आता लोकांची विचारपद्धत बदलली आहे. ते स्वतःला राज्य किंवा देशाशी जोडत नाहीत जी चांगली गोष्ट आहे."

मनोज वाजपेयींचा 'सायलेंस 2' ही नुकताच रिलीज झाला. याही सिनेमाने लक्ष वेधून घेतलं. आता त्यांच्या आगामी 'फॅमिली मॅन' सीरिजच्या पुढील भागाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :मनोज वाजपेयीघटस्फोटबॉलिवूडसिनेमा