Join us

VeerZaara : "वीर झारा'मध्ये आणखी स्क्रीन मिळायला हवी होती", मनोज वाजपेयी यांनी व्यक्त केली मनातली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 19:19 IST

मनोज यांनी एका मुलाखतीत 'वीर झारा' या सुपरहिट चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

भारतीय कलाविश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांचं आवर्जुन नाव घेतलं जातं. नुकताच त्यांच्या कारकिर्दीतील १०० वा 'भैयाजी' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.  मनोज यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, यात एक सिनेमा असा होता, ज्यात खूपच छोटं पात्र साकारल्याची सल आजही त्यांच्या मनात सलत आहे.

 मनोज यांनी एका मुलाखतीत 'वीर झारा' (VeerZaara) या सुपरहिट चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. ते म्हणाले की, "या सिनेमात माझी भूमिका खूपच छोटी होती. त्यामुळे त्याचे चित्रीकरण अवघ्या चार दिवसांत पूर्ण झाले. यामध्ये मला आणखी स्क्रीन शेअर करायला मिळायला हवी होती. यश चोप्रासारख्या दिग्दर्शकांसोबत काम करणे ही माझ्यासाठी मोठी संधी होती".

पुढे ते म्हणाले, "'वीर झारा 'मध्ये काम करण्याचा अनुभव चांगला आहे. पण, मी चित्रपटाचे तीन दिवस दिल्लीत आणि त्यानंतर एका दिवसात अमृतसरमध्ये चित्रीकरण पूर्ण केले. या चित्रपटात माझी पाहुण्या कलाकाराची (कॅमिओ) भूमिका होती. यश चोप्रा आणि त्यांच्या टीमने मला खूप आदर दिला. यश चोप्रांसारख्या दिग्दर्शकाने मला काम करण्याची संधी दिली, यासाठी मी नेहमीच त्यांचे धन्यवाद मानतो. यश चोप्रा चित्रपटातील माझ्या भूमिकेबाबत माझ्याशी खूप प्रामाणिक होते. यश चोप्रा यांनी माझे 'पिंजर' चित्रपटातील काम पाहून मला 'वीर झारा 'मध्ये कास्ट केले होते. मला माहीत आहे की, ही एक प्रेमकथा होती".

मनोज वाजपेयी हे कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतात.  मनोज हे 'फॅमिली मॅन 3'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'फॅमिली मॅन 3' च्या शूटींगला सुरुवात झाली आहे. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी यांच्यासह प्रियामणी, शरद केळकर, शारिब हाश्मी हे कलाकारही आहेत. 

टॅग्स :मनोज वाजपेयीसेलिब्रिटीबॉलिवूडयश चोप्रा