भारतीय सिनेसृष्टीत मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हे सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या अभिनयाला तोड नाही. 'सत्या'मधील भूमिका असो किंवा 'गँग्स ऑफ वासेपूर' मनोज वाजपेयी सगळीकडेच भाव खाऊन जातात. प्रत्येक जण त्यांचा आदर करतो. पण मनोज वाजपेयींना कधी घराणेशाही, नेपोटिझम, गटबाजीचा सामना करावा लागला नसेल का?
मनोज वाजपेयी यांनी नुकतीच आज तकच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. सिनेसृष्टीतील गटबाजीवर बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले, "मला कधीच इतर स्टारकिड्स करणार नाहीत. असंच काम नवाजने केलं असतं, इरफान असता तर त्याने केलं असतं किंवा केके मेननने केलं असतं. अव्यावसायिक सिनेमांकडे कोणीही लक्ष देत नाही आणि त्यात आपले पैसेही गुंतवत नाहीत. मग तुम्ही ते सर्व फक्त निमित्त म्हणून घेऊ शकत नका. तुमची वेळ त्यात वाया घालवू नका. थिएटर करा, तुम्ही खरंच जर चांगले अभिनेता असाल तर रस्त्यावर नाटक करून सुद्धा पैसे कमवू शकता."
सुशांत गटबाजी सांभाळू शकला नाही
मनोज वाजपेयी म्हणाल, "सुशांतचा मृत्यू माझ्यासाठी धक्काच होता. आमची सिनेमाच्या सेटवर खूप चांगली मैत्री झाली होती. तो माझ्याशी त्याला येत असलेल्या आव्हानांबद्दल बोलला होता. पण इंडस्ट्रीतील राजकारण आणि गटबाजी तो हाताळू शकला नाही. जसजशी आपली प्रगती होत जाते तसतशी स्पर्धा सुद्धा वाढत असते. तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये राजकारण असतं. जसजसे तुम्ही यशाच्या शिडीवर चढता तसतसे ते अधिक घाण होत जाते. मला यात कधीच अडचण आली नाही, कारण मी हट्टी आणि जाड कातडीचा होतो. पण तो तसा नव्हता आणि तो तसा दबाव हाताळू शकला नाही. या गोष्टींबद्दल तो माझ्याशी बोलला कारण तो खूप प्रभावित झाला होता.