Join us

"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 23:05 IST

Manoj Muntashir : "मोदीजी आमचा बदला आपण घ्या आणि यावेळी चकमकीत चार गांडुळे मारून आमचा बदला पूर्ण होणार नाही. तर आम्हाला पाकिस्तानी सैन्याची कापलेली मस्तकं हवी आहेत. शिरा पीओकेमध्ये आणि दाखवून द्या बाप कोण आहेते..."

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. काल झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यावेळी कट्टरपंथी दहशतवाद्यांनी धर्म विचारून आणि कलमा पढायला सांगून, निष्पाप नागरिकांवर गोळ्या झाडल्या. यानंतर विविध स्थरांतून संताप व्यक्त होत आहे. यातच, गीतकार मनोज मुंतशीर यांनीही एक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. "हर हर महादेव म्हणून तुम्ही संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत गुडघेच टेका, कल्मा वैगेरे शिका, किमान जीव तर वाचेल तुमचा," असे मुंतशिर यांनी म्हटले आहे.

मनोज मुंतशिर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, "अभिनंदन! या गोळ्या तुमच्या प्रियजनांना लागल्या नाहीत. तुमचा मुलगा अथवा भाऊ पहलगाममध्ये मारला गेला नाही. पण किती दिवस वाचाल? काश्मिरात गेला नाहीत, तर मुर्शिदाबादमध्ये मारले जाल, कोलकात्यात मारले जाल, गोध्र्यात मारले जाल, दिल्लीत, मुझफ्फरनगरमध्ये मारले जाल. जर तुम्ही वाघ नाही, बकरे आहात, हे ठरवलेच असेल, तर कत्तलीसाठी तयार रहा. नंबर येणारच आहे. माझ्याकडे एक आयडीया आहे. हर हर महादेव म्हणून तुम्ही संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत गुडघेच टेका, कल्मा वैगेरे शिका, किमान जीव तर वाचेल तुमचा.  डोकं तर धडावेगळं होणार नाही. वाईट वाटतंय ना? कमेंटमध्ये मला शिव्या देण्यासाठी बोटे वळवळत आहेत ना? जेवढे तुमची बोटे वळवळत आहेत, तेवढेच तुमच्या मनगटातील रक्त सळसळले असते, तर २५ निष्पाप हिंदू मारले गेले नसते."

दहशतवादाला धर्म नसतो, असे तर मुळीच म्हणू नका -मनोज मुंतशीर पुढे म्हणाले, "समस्या अशी आहे की, तुम्ही अजूनही समजू शकत नाही, मी म्हणेन, हिंदू धोक्यात आहेत, तुम्ही म्हणाल, आरएसएसचा आहे. मी म्हणेन, बटोंगे तो कटोंगे, तुम्ही म्हणाला, भाजपचा आहे. मी म्हणेन औरंगजेबाचा इस्लाम चालणार नाही. तुम्ही म्हणाल, आम्ही तर सेक्यूलर आहोत. जोवर दर्ग्यावर चादर चढवत नाही, तोवर आम्हाला जमतच नाही. हे जे गंगा-जमुना तहजीबचे कार्ड घेऊन तुम्ही फिरत आहात, दाखवायचे असते पहलगाममध्ये, घ्यायची असतील त्यांची गळाभेट. आणि ऐका, दहशतवादाला धर्म नसतो, असे तर मुळीच म्हणू नका. 

बाप कोण आहे दाखवून द्या -मनोज मुंतशीर एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पंतप्रधान मोदींनाही आवाहन केले. ते म्हणाले, मोदीजी आमचा बदला आपण घ्या आणि यावेळी चकमकीत चार गांडुळे मारून आमचा बदला पूर्ण होणार नाही. तर आम्हाला पाकिस्तानी सैन्याची कापलेली मस्तकं हवी आहेत. शिरा पीओकेमध्ये आणि दाखवून द्या बाप कोण आहेते."

टॅग्स :पहलगाम दहशतवादी हल्लाबॉलिवूड