करिना अन् दीपिकाला सीतामातेचा रोल दिलाच नव्हता, मनोज मुंतशिरने सांगितलं सत्यवचन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 12:49 PM2021-09-17T12:49:31+5:302021-09-17T12:59:51+5:30

'द अवतार- सीता' असे या सिनेमाचे नाव असणार आहे. सिनेमातल्या सीतेच्या भूमिकेसाठी प्रचंड वादही निर्माण झाला होता. कारण करिना कपूरलाही भूमिका ऑफर झाल्याची माहिती समोर आली होती.

Manoj Muntashir Revealed Kareena and Deepika were not approached for The Incarnation Sita | करिना अन् दीपिकाला सीतामातेचा रोल दिलाच नव्हता, मनोज मुंतशिरने सांगितलं सत्यवचन

करिना अन् दीपिकाला सीतामातेचा रोल दिलाच नव्हता, मनोज मुंतशिरने सांगितलं सत्यवचन

googlenewsNext

मनोरंजन विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सीताची भूमिका साकारली आहे.‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित आणखी एक सिनेमा बनणार आहे. 'द अवतार- सीता' असे या सिनेमाचे नाव असणार आहे. सिनेमातल्या सीतेच्या भूमिकेसाठी प्रचंड वादही निर्माण झाला होता. कारण करिना कपूरलाही भूमिका ऑफर झाल्याची माहिती समोर आली होती. ही भूमिका साकारण्यासाठी करिनाने १२ कोटी मानधन मागितल्याचेही बोलले गेले. पण करिना कपूर ही भूमिका साकारणार असल्याचे कळताच तिच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली. कारण या भूमिकेसाठी फक्त हिंदूच अभिनेत्री असावी असे चाहते मागणी करत होते. 

करिनानंतर सीतेच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींच्या नावाची चर्चा झाली. यात दीपिका पदुकोणचेही नाव आघाडीवर होते.  पण अलीकडेच कंगना राणौत या सिनेमात सीतेची भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आता पुन्हा एकदा या सिनेमासंबंधीतच वेगळीच माहिती समोर आली आहे. सिनेमाचे  संवाद लेखक मनोज मुंताशीर यांनी सीतेच्या भूमिकेसाठी करीना-दीपिकाशी संपर्क साधला नसल्याचेची माहिती दिली आहे.


जेव्हा करिनाशी या भूमिकेसाठी संपर्कच साधला गेला नाही. तसेच दीपिकाबरोबरही या भूमिकेविषयी बोलणे झाले नसल्याचे  खुद्द मनोज मुंतशीर यांनी ही अफवा असल्याचे म्हटले आहे. फ्री प्रेस जर्नलच्या मुलाखतीत त्यांनी सुरु असलेल्या अफवांविषयी खुलासा केला आहे.

 

अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, या भूमिकेसाठी तरुण वयातील अभिनेत्रीचा शोध घेतला जात होता.या सिनेमाचे दिग्दर्शन आलोक देसाई करणार आहेत. या सिनेमासाठी एक भव्य सेट बनवला जाणार आहे. ‘अ ह्युमन बीइंग’ स्टुडिओच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मित होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त हा सिनेमा तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.


कंगणा राणौतचा  ‘थलायवी’सिनेमाही नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमातल्या तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक होत आहेत.'थलायवी'नंतर आता सीतेच्या भूमिकेसाठी कंगणा प्रचंड उत्सुक आहे. सोशल मीडियावर खुद्द कंगणानेच सीतेची भूमिका साकारणार असल्याचे चाहत्यांना सांगितले होते. तेव्हापासून कंगणाला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही प्रचंड उत्सुक आहेत. कंगणावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 
 

Web Title: Manoj Muntashir Revealed Kareena and Deepika were not approached for The Incarnation Sita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.