भोजपुरी सिनेमातून राजकारणात दाखल झालेले भाजपचे खासदार मनोज तिवारी यांचे आयुष्य खूप संघर्षपूर्ण राहिले . मनोज तिवारी यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1971 रोजी वाराणसीत झाला होता. मनोज तिवारी यांचा पहिला सिनेमा ‘ससुरा बड़ा पैसावाला’ला चांगलं यश मिळाले. 2004 मध्ये मनोज तिवारी यांनी ‘ससुरा बड़ा पइसावाला’ हा भोजपुरी सिनेमा केला. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यानंतर त्यांनी अनेक हिट सिनेमे दिलेत. मनोज तिवारी यांचे बालपण खूप कठीण परिस्थिती गेले. एकदा त्यांनी स्वत: ला सांगितले की, ते शाळेत चार किलोमीटर चालत जायचे आणि प्लेटफॉर्मवर झोपायचा.
भोजपुरी सिनेमांमध्ये काम केल्यानंतर मोनज तिवारींनी 2009मध्ये राजकारणात प्रवेश केला.. ते आधी सपामध्ये आणि त्यानंतर 2010 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. यावर्षी दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने मनोज तिवारी चर्चेत आले. लॉकडाऊन काळात मनोज यांनी सुरभीसोबत दुसरे लग्न केले. याच दुस-या पत्नीपासून मनोज यांना दुसरी मुलगी झाली.
सिनेमात येण्यापूर्वीच म्हणजे 1999 मध्ये त्यांनी राणी तिवारीसोबत लग्न केले होते. मनोज यांनी 13 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. पहिल्या पत्नीला दिलेल्या घटस्फोटानंतर लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच एप्रिल 2020 मध्ये मनोज तिवारींनी सुरभी तिवारीशी लग्न केले. सुरभी मनोज यांची सेक्रेटरी होती आणि ती एक चांगली गायिकाही आहे.
मनोज तिवारींची मोठी मुलगी जियाची इच्छा होती की वडिलांनी दुसरं लग्न करावे. अलीकडेच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. मनोज तिवारी म्हणाले की, पहिली पत्नी राणीशी घटस्फोट होऊन जवळपास 10 वर्षे झाली आहेत. मात्र आजही आमच्या दोघांमध्ये संवाद कायम आहे. मनोज तिवारी यांची मोठी मुलगी जियाची इच्छा होती वडिलांनी दुसरं लग्न करावं. जिया आणि सुरभी चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांचे चांगले जमते.