भोजपुरी इंडस्ट्रीचे सुपरस्टार आणि उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांच्या घरी घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. मनोज तिवारी यांनी ट्वीट करत ही आनंदाची बातमी शेअर आहे. आपल्या चिमुकलीसोबतचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. तूर्तास मनोज तिवारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो.‘मेरे घर आयी एक नन्ही परी... I am blessed with a baby girl... जय जगदंबे.. ,’ असे ट्वीट त्यांनी केला आहे. याच ट्वीटसोबत आपल्या गोंडस मुलीला एक फोटो देखील शेअर केला आहे.
मनोज तिवारी यांना पहिली मुलगी आहे. ती मुंबईत शिकते. मनोज तिवारी यांनी गेल्या काही वर्षात राजकारणात चांगलाच जम बसवला. मात्र त्यांची भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार म्हणून ते अधिक लोकप्रिय आहेत.
गायन क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर 2004 साली त्यांनी ‘ससुरा बडा पईसावाला’ या भोजपुरी सिनेमातून डेब्यू केला. त्यांचा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. यानंतर त्यांनी भोजपुरी इंडस्ट्रीत अनेक हिट सिनेमे दिलेत. 2009 साली सपाच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढली. मात्र त्यांचा पराभव झाला. 2013 साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पूर्व दिल्लीतून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकलेही. त्यानंतर ते दिल्ली भाजपचे अध्यक्षही बनले.