Join us

Manoj Tiwari :  मनोज तिवारी 51 व्या वर्षी पुन्हा होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळ जेवणाचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 5:43 PM

Manoj Tiwari : होय, वयाच्या 51 व्या वर्षी मनोज तिवारी पुन्हा एकदा बाबा होणार आहेत. खुद्द मनोज यांनी सोशल मीडियावर ही गुडन्यूज शेअर केली.

अभिनेता, गायक आणि राजकीय नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari ) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सध्या मनोज तिवारी त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आले आहेत. होय, वयाच्या 51 व्या वर्षी मनोज तिवारी पुन्हा एकदा बाबा होणार आहेत. खुद्द मनोज यांनी सोशल मीडियावर ही गुडन्यूज शेअर केली. पत्नी सुरभी यांच्या डोहाळ जेवणाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

‘काही गोष्टींचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. तो आनंद फक्त अनुभवावा लागतो,’असं त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.  त्यांच्या या पोस्टनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

सुरभी यांच्यासोबत मनोज तिवारींचं हे दुसरं लग्न आहे. 1999 मध्ये मनोज यांनी राणीशी लग्न केलं होतं. मात्र काही वर्षांआधी त्यांचा घटस्फोट झाला. त्या दोघांना रिती नावाची मुलगी आहे. 2020 मध्ये लॉकडाऊन काळात मनोज यांनी सुरभी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्या दोघांना सान्विका नावाची मुलगी झाली. आता मनोज तिसर्‍यांदा बाबा होणार आहेत. 

मनोज तिवारी यांनी गेल्या काही वर्षात राजकारणात चांगलाच जम बसवला. मात्र त्यांची भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार म्हणून ते अधिक लोकप्रिय आहेत. गायन क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर 2004 साली त्यांनी ‘ससुरा बडा पईसावाला’ या भोजपुरी सिनेमातून डेब्यू केला. त्यांचा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. यानंतर त्यांनी भोजपुरी इंडस्ट्रीत अनेक हिट सिनेमे दिलेत. 2009 साली सपाच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढली. मात्र त्यांचा पराभव झाला. 2013 साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2014 च्या लोकसभा  निवडणुकीत उत्तर पूर्व दिल्लीतून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकलेही. त्यानंतर ते दिल्ली भाजपचे अध्यक्षही बनले.

टॅग्स :भाजपासेलिब्रिटी