Join us

'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये झळकणार मानुषी छिल्लर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 15:06 IST

Manushi Chhillar : अभिनेत्री मानुषी छिल्लर 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये रुपेरी पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.

अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) ही तिच्या जबरदस्त आणि प्रतिभावान अभिनयासाठी ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये तिने स्वतःच अनोखं स्थान निर्माण करत आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्स देखील केले. पृथ्वीराजमधील तिच्या उल्लेखनीय पदार्पणानंतर आता ती विकी कौशल, मनोज पाहवा आणि कुमुद मिश्रा या कलाकारांच्या सोबतीने द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये रुपेरी पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. 

द ग्रेट इंडियन फॅमिली हा एक चित्रपट भावनांचा रोलर-कोस्टर राइड असल्याच कळतंय. मानुषी छिल्लर एका सशक्त स्त्रीची भूमिका साकारताना बघायला मिळणार असून जिचा प्रवास विकीच्या पात्राला आधार देणारा आधारस्तंभ म्हणून उलगडणार आहे. प्रेक्षक त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री बघण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे आणि यशराज फिल्म्स या बॅनरची निर्मिती असून प्रीतमने या चित्रपटाला संगीत दिले आहे.

ट्रेलर मधून मानुषी छिल्लरच्या करिष्माने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत पण आता सगळेच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. मानुषीच्या तेजस्वी मोहकतेसह द ग्रेट इंडियन फॅमिली एक अनोखा चित्रपट असणार यात शंका नाही. मानुषी छिल्लरचे बॉलीवूडमधील काम बघता येणाऱ्या चित्रपटात ती नक्कीच पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. द ग्रेट इंडियन फॅमिली २२ सप्टेंबर रोजी रिलीज होणार असून एक उत्तम चित्रपट सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे.
टॅग्स :मानुषी छिल्लरविकी कौशल