यश चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमाची जादू आजही कायम असल्याचे तुम्ही पाहिलंय... रसिकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतल... राज आणि सिमरन यांच्या प्रेमकहाणीतून रोमांसच्या बादशाह यश चोप्रा यांनी रोमँटिक राजला नवी ओळख मिळवून दिली... शाहरुख आणि काजोलची जोडी रातोरात हिट झाली... मात्र ज्या सिनेमागृहात 'दिल दुल्हनिया ले जायेंगे'ने २३ वर्षाहूनही अधिक काळ पूर्ण केलीत त्या मराठा मंदिरला आजही या रोमांटिक जोडीची प्रतीक्षा आहे.
बड्या बापाचा मुलगा राज आणि एका भारतीय पंजाबी घरातील मुलगी सिमरन.... 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमातील किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या प्रेमकहाणीने जणू नवा इतिहास रचलाय... या सिनेमानंतर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रोमँटिक सिनेमांचे पर्व सुरु झाले... आजही इतक्या वर्षानंतरही रसिकवर राज आणि सिमरनने भुरळ घातलीय... त्यामुळेच चित्रपटरसिकांची पाऊल आपसुकच मुंबईतील मराठा मंदिर थिएटरकडे वळतात... सध्या विकेंड अर्थात शुक्रवार,शनिवार आणि रविवार या दिवशी सिनेमाना गर्दी होते.. मात्र 23 वर्षानंतरही इतकेच काय तर कोरोना काळातही मराठा मंदिरमधील दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेचा प्रत्येक शोला रसिक उपस्थिती लावतात.... जवळपास ६० ते ७० टक्के कलेक्शन या सिनेमाचे आजही होते.
हीच रसिकांची पोचपावती खुद्द यश चोप्रा यानाही मराठा मंदिरला येऊन चित्रपटरसिकांच्या साक्षीने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेचा आनंद घेण्यापासून रोखू शकली नव्हती. मात्र मराठा मंदिर थिएटर, तिथे येणारे रसिक आणि मराठा मंदिर थिएटरचा स्टाफ आजही या सिनेमाच्या यशस्वी जोडीच्या प्रतीक्षेत आहेत.यश चोप्रा सोबत बादशाह शाहरुख आणि काजोलसुधा मराठा मंदिरमध्ये येवून 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा सिनेमा पाहतील अशी आस गेल्या कित्येक वर्षापासून बांधून आहेत.
मात्र आजवर किंग इथे आलाय ना काजोल... इतक्या मोठ्या प्रमाणत रसिक राजची भूमिका डोक्यावर घेतील असा स्वप्नातही वाटला नव्हता असा शाहरुख सांगतो..सलग २३ वर्ष एकाच थिएटरमध्ये शो सुरु राहणं ही वेगळीच भावना असल्याच त्याला वाटतं. त्यामुळे रसिक म्हणतील दिलवाले पिक्चर देखणे आयेंगे आणि राज-सिमरन की राह देखेंगे.