Join us  

'माझ्याकडे काम नसतं तेव्हा..'; 'या' कारणामुळे वैभव तत्ववादी कटाक्षाने टाळतो इंडस्ट्रीतील पार्ट्यां

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 8:35 AM

Vaibhav tatwawaadi: अलिकडेच वैभव 'कमांडो' या सीरिजमध्ये झळकला. या निमित्ताने त्याने त्याच्या प्रोफेशनल लाइफविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

उत्तम अभिनयशैली आणि स्मार्ट पर्सनालिटी यामुळे खासकरुन ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी (vaibhav tatwawaadi).  'कॉफी आणि बरंच काही', 'भेटली तू पुन्हा', 'सर्किट' यांसारख्या कितीतरी मराठी सिनेमांमध्ये वैभव झळकला आहे. मराठीसह वैभवने त्रिभंगा,'हंटर', 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' यांसारख्या हिंदी सिनेमांमध्येही तो झळकला आहे. अलिकडेच वैभव 'कमांडो' (commando) या सीरिजमध्ये झळकला. या सीरिजमध्ये त्याने केलेल्या कामाचं सध्या सर्वस्तरांमधूम कौतुक केलं जात आहे. विशेष म्हणजे आज त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. परंतु, खऱ्या आयुष्यात त्याला फार मोजके मित्र-मैत्रिणी आहेत. इतकंच नाही तर तो फारसा कुठल्याही फिल्मी पार्ट्यांमध्ये दिसत नाही. यामागचं कारण नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये दिलं.

कलाविश्वात सर्रास पार्ट्या, अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत असल्याचं पाहायला मिळतं. यात एखाद्या सिनेमाची सक्सेस पार्टी, बर्थ डे सेलिब्रेशन वा एखाद्या सण, उत्सवाचं सेलिब्रेशन असं काही ना काही कलाकारांच्या घरी होत असतं. या पार्ट्यांमध्ये कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी हजेरी लावतात. परंतु, त्या सगळ्याला वैभव अपवाद आहे. तो फारसा कुठल्याही पार्टीमध्ये दिसत नाही. यामागचं कारण त्याने सांगितलं.

'गळणारं छत अन् उंदरांचा सुळसुळाट'; एकेकाळी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राहायचा वैभव

'तू इतर कलाकारांमध्ये फारसा दिसत नाही. किंवा, कोणत्याही मराठी कार्यक्रमांमध्ये दिसत नाही. त्यामागचं कारण काय? हा अलिप्तपणा ठरवून आहे का?' असा प्रश्न वैभवला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत त्याने सगळ्यांपासून लांब राहण्याचं कारण सांगितलं.

"मी प्रायव्हेट माणूस आहे. ज्यावेळी माझ्याकडे काम नसतं त्यावेळी मी घरी वाचन करत बसतो. किंवा मग, मी प्रवास करतो. माझ्याकडे बोलण्यासारखं फारसं काही नसतं. त्यामुळे मला माझ्याच विश्वात रमायला जास्त आवडतं", असं उत्तर वैभवने दिलं.

दरम्यान, वैभव आज मराठी कलाविश्वातील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. वैभवचा फिमेल फॅन फॉलोअर्स जास्त असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच तो कमांडो या वेब सीरिजमध्ये झळकला होता. या सीरिजमध्ये त्याने सैनिकी पार्श्वभूमी असलेली भूमिका केली आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये तो अनेक अॅक्शन स्टंट करताना दिसून आला आहे.

टॅग्स :वैभव तत्ववादीसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडमराठी अभिनेता