मराठमोळी अभिनेत्री व मॉडेल अनुषा दांडेकरची गेल्या कित्येक दिवसांपासून तिच्या ब्रेकअपची चर्चा सुरू होती. मात्र याबाबत तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्राने खुलासा केला आहे. त्याने त्यांचे ब्रेकअप न झाल्याचे सांगितले. अनुषा सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने हॉट फोटो शेअर केला आहे.
अनुषा दांडेकर हिने काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट टॉपमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोला खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.
सध्या आम्ही दोघे एकत्र राहत नाही आहोत, त्यामुळे सगळ्यांना वाटतेय आमचं ब्रेकअप झाले आहे. मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही आहे म्हणून आमच्या ब्रेकअपची अफवाह पसरवण्यात आली. मला या सगळ्या गोष्टींमुळे फरक पडत नाही मात्र अनुषा इमोशनल आहे तिला फरक पडतो.