Join us

शाहरुखच्या 'जवान'मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची भूमिका, आमिरनंतर किंग खानसोबत काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 15:01 IST

बऱ्याच काळ गायब असलेल्या मराठी अभिनेत्रीचं थेट शाहरुखच्या सिनेमातून कमबॅक

शाहरुख खानचा (Shahrukh Khan)'पठाण' सिनेमा तुफान गाजला. सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. यानंतर लगेचच शाहरुख 'जवान' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त झाला. सेटवरील सतत काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कालच शाहरुखने सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला. यासोबतच सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

'जवान' (Jawaan) सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. काल सिनेमाचा फर्स्ट लुक व्हायरल झाला. दरम्यान सिनेमात आणखी कोणाची भूमिका आहे हे देखील स्पष्ट झाले आणि त्यात चक्क मराठमोळ्या अभिनेत्रीचंही नाव दिसलं.

कोण आहे ती मराठी अभिनेत्री ? 

तर 'जवान' सिनेमात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोलेची (Girija Oak Godbole) भूमिका असणार आहे.होय, गिरीजाने 'जवान'चा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर तिचा नवरा सुहृद गोडबोलेने स्टोरी शेअर केली. त्यात त्याने लिहिले,"अनेक दिवसांपासून जे लोक मला विचारत आहेत की गिरीजा सध्या काय करतीए त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. मला तुझा अभिमान आहे." गिरीजा बऱ्याच काळापासून पडद्यावरुन गायब होती. पण आता तिने थेट शाहरुख खानच्या सिनेमातूनच कमबॅक केलंय. "दोन वर्षांच्या मेहनतीनंतर माझी फिल्म, आपली फिल्म अखेर थिएटर्समध्ये रिलीज होत आहे." असं कॅप्शन तिने पोस्टखाली दिलं आहे.

गिरीजाने याआधी आमिर खानसोबत 'तारे जमीन पर' सिनेमात छोटीशी भूमिका केली होती. आता आणखी एका खानसोबत तिची भूमिका असणार आहे. सई ताम्हणकरसह इतर मराठी कलाकारांनी गिरीजावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

कधी होणार रिलीज ?

'जवान' याआधी जून महिन्यात रिलीज होणार होता. मात्र आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आता सिनेमा 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. शाहरुख खानसह साऊथ अभिनेत्री नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.शिवाय सिनेमातच अभिनेत्री सान्या मल्होत्राचीही भूमिका आहे.

टॅग्स :गिरिजा ओकशाहरुख खानसिनेमाबॉलिवूडमराठी अभिनेता