Join us

'गली ब्वॉय' सिनेमात झळकणार ही मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 19:32 IST

'गली ब्वॉय' सिनेमात झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या एका रॅपरची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देअमृृता सुभाष दिसणार 'गली ब्वॉय' सिनेमात

रणवीर सिंगचा 'सिम्बा' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो आहे. ‘सिम्बा’ने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली असताना आता रणवीरचा आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे, 'गली ब्वॉय'. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमच रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी एकत्र दिसणार आहे. त्यात आता या चित्रपटात मराठी अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही अभिनेत्री कोण हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... अभिनेत्री अमृता सुभाष या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

'गली ब्वॉय' सिनेमात  झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या एका रॅपरची गोष्ट पाहायला मिळणार आहे. २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाचा पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. अमृताने सोशल मीडिया पोस्टद्वारे या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्यास खूप मजा आली असे अमृताने पोस्टमध्ये म्हटले आहे.  या चित्रपटाच्या निमित्ताने अमृता पहिल्यांदाच रणवीर सिंगसोबत काम करत आहे. या चित्रपटातील तिची बहुतेक दृश्य ही रणवीर सोबत चित्रीत करण्यात आली आहेत. 'गली ब्वॉय'चे बरचेस चित्रीकरण हे धारावीमध्ये करण्यात आले आहे.

रणवीर सोबत काम करण्याचा अनुभव हा खूपच वेगळा होता असेही अमृता म्हणाली. 'गली ब्वॉय'मध्ये चित्रपटात ती कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. हा सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :गली ब्वॉयअमृता सुभाषरणवीर सिंगआलिया भट