Join us  

कोविड नव्हे 'या' कारणामुळे रखडली होती 'झुंड'ची रिलीज डेट; नागराज मंजुळे यांनी केला खुलासा

By शर्वरी जोशी | Published: February 20, 2022 4:50 PM

Jhund: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं त्यामुळे नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

'सैराट', 'नाळ' आणि 'पिस्तुल्या' या चित्रपटांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' (jhund)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारत असून या चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे (nagraj popatrao manjule) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळेच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. येत्या ४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.  या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. सोबतच हा चित्रपट रिलीज व्हायला इतका वेळ का लागला यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं त्यामुळे नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, त्यांचा झुंड हा चित्रपट प्रदर्शित व्हायला बराच वेळ लागला. विशेष म्हणजे हा चित्रपट इतक्या उशीराने का प्रदर्शित होतोय यामागचं कारण नागराज मंजुळे यांनी दिलं आहे.

Exclusive:...म्हणून चित्रपटांसाठी नागराज मंजुळे करतात नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांची निवड

"हा चित्रपट तयार होऊन जवळपास दोन-अडीच वर्ष झाले आहेत. मात्र, काही कारणास्तव तो रखडला होता. त्यात कोविडची परिस्थितीही निर्माण झाली आणि हा चित्रपट प्रेक्षकांनी पडद्यावर पाहावा असं मला वाटत होतं. लोकांनी 'झुंड' करुनच हा चित्रपट पाहिला पाहिजे ही इच्छा होती. त्यामुळेच थोडा वेळ लागला. पण, फायनली आता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे याचा वेगळाच आनंद आहे," असं नागराज मंजुळे म्हणाले.

दरम्यान, झुंड या चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. येत्या ४ मार्च हा चित्रपट प्रदर्शित होत असून यात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे.  

टॅग्स :नागराज मंजुळेअमिताभ बच्चनबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी