अजय देवगण(Ajay Devgn)चा 'भोला' (Bhola Movie) या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००२ मध्ये मि. इंडिया बनल्यानंतर महाराष्ट्र श्री, भारत श्री, मुंबई श्री असे बॅाडीबिल्डींगमधील मानाच्या पुरस्कारांवर नाव कोरणारा मराठमोळा बाॅडीबिल्डर-अभिनेता केतन करंडे (Ketan Karande) या चित्रपटात झळकणार आहे. शाहरुख खानच्या 'असोका'मधून सिनेइंडस्ट्रीत दाखल झालेल्या केतनने 'भोला'मध्ये कच्छा गँग बॅास नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.
'अॅक्शन जॅक्सन'च्या निमित्तानं सर्वप्रथम अजय आणि केतन यांची भेट झाली होती. 'जोधा अकबर', 'पानीपत', 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान', 'रेस २' सारखे बरेच चित्रपट केतननं केले आहेत. 'भोला'बाबत केतन म्हणाला की, ऑडीशनद्वारे मला हा रोल मिळाल्यानंतर अजयनं बोलावून घेतलं आणि स्टोरी व रोल समजावून सांगितला. यात माझा ओपन बाॅडी सिक्वेन्स आहे. त्यामुळे बाॅडीचा कलर टोन बदलण्यासाठी २५-३० दिवस उन्हात झोपलो. बाॅडी बनवून अजयसमोर गेलो तेव्हा ते पाहून थक्क झाले. २५ हैदराबाद आणि १५ दिवस मुंबईत शूट केलं. अजयनं मला लक्ष्मी रायच्या आयटम साँगमध्येही संधी दिली. त्यात डान्सही केल्याचं केतन म्हणाला. बाॅडीबिल्डींगसोबतच केतन तरुण-तरुणींसोबतच चाळीसीतील लोकांना व्यायाम आणि निर्व्यसनी जीवन व फिटनेसचे धडे देण्याचे काम करतो.