शाहीदची लाडकी बहीण ‘या’ अभिनेत्यासोबत करणार लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2017 12:26 PM
शाहिद कपूरची लाडकी बहीण सना कपूर हिने भावाच्या पावलावर पाऊल टाकत चालायचे अगदी ठरवून टाकलेले दिसते. सर्वात आधी सना ...
शाहिद कपूरची लाडकी बहीण सना कपूर हिने भावाच्या पावलावर पाऊल टाकत चालायचे अगदी ठरवून टाकलेले दिसते. सर्वात आधी सना भाऊ शाहिद कपूरच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आली. करण जोहरच्या ‘शानदार’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. आता भावाप्रमाणेच अगदी गुपचूप साखरपुडा उरकूर सना मोकळी झालीय. होय, शाहिदने मीरा राजपूत हिच्याशी अगदी गुपचूप साखरपुडा केला होता. सनाने सुद्धा अगदी तशाच साखरपुडा केला. अभिनेता मयंक पाहवा याच्याशी सनाने साखरपुडा केल्याचे कळतेय. मयंक हा अभिनेता मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांचा मुलगा आहे. काल-परवा अगदी अनपेक्षित पद्धतीने ही बातमी फुटली. दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता पुरी यांनी ओम पुरी यांच्या मृत्यूपूर्वी कशी स्थिती होती हे सांगताना चुकून या गोष्टीचा खुलासा केला. ‘आम्ही पंकज कपूर यांची मुलगी आणि पाहवा यांच्या मुलाच्या साखरपुड्याला निघणार होतो. ओम यांनी मला फोन केला होता. मी पोहोचण्याआधीच ते घरी आले होते’ असे नंदिता पुरी बोलून गेल्या. यातूनच सना व मयंक यांचा साखरपुडा झाल्याची बातमी फुटली. अर्थात कपूर कुटुंबाने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. शाहीद कपूर सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. लवकरच शाहीदचा ‘रंगून’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. नुकताच ‘रंगून’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ दाखविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये कंगना १९४० दरम्यानच्या एका चित्रपट नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शाहिद या चित्रपटामध्ये जमादार नवाब मलिक या भूमिकेत झळकणार आहे.