Join us

मसाबा गुप्ता होणार आई, पतीसोबतचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 08:57 IST

घरी छोटा पाहुणा येणार यामुळे मसाबाची आई म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने (Masaba Gupta)cकाल चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली. मसाबा आई होणार आहे. पती सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Mishra) एक फोटो शेअर करत तिने ही बातमी दिली. मसाबा आणि सत्यदीप मिश्रा गेल्यावर्षीच लग्नबंधनात अडकले होते. घरी छोटा पाहुणा येणार यामुळे मसाबाची आई म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

३४ वर्षीय मसाबा गुप्ताने इन्स्टाग्रामवर गरोदर महिलेचा एक क्युट इमोजी शेअर केला. त्यानंतर डोळ्यात हार्ट् असलेले आई आणि बाबाचे असे दोन इमोजी शेअर केले. शेवटी तिसऱ्या पोस्टमध्ये तिने पतीसोबतचा फोटो पोस्ट केला.  यामध्ये ती सत्यदीपच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली आहे. तर त्यांच्यावरती छोट्या पायांचे डिझाईन आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "छोटी पावलं आमच्याकडे चालत येत आहेत. तुमचं खूप प्रेम, आशीर्वाद आणि केळीचे वेफर्स(फक्त प्लेन सॉल्टेड) पाठवा.#momnddad' 

तर नीना गुप्ता यांनीही आनंद व्यक्त करत लिहिले, 'आमच्या मुलांना मुलं होणार आहे. यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो.'

अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत मसाबा आणि सत्यदीपला शुभेच्छा दिल्या आहेत. मसाबा गुप्ताचं हे दुसरं लग्न आहे. याआधी 2015 मध्ये तिने मधु मंटेनासोबत लग्न केले होते. 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. गेल्या वर्षीने तिने अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. सत्यदीपचंही हे दुसरं लग्न आहे. याआधी तो आदिती राव हैदरीचा नवरा होता. 2013 मध्ये ते वेगळे झाले होते. 

टॅग्स :नीना गुप्तापरिवारगर्भवती महिलासोशल मीडिया