‘मास्टर’ या सुपरडुपर हिट चित्रपटानंतर मालविका मोहनन (Malavika Mohanan) हे नाव प्रचंड चर्चेत आलं होतं. मालविका ही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री. तूर्तास ती चर्चेत आहेत ती तिच्या नव्या फोटोंमुळे. होय, मालविकाने काही फोटो शेअर केले आहेत आणि ते पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मालविकानं गुपचूप लग्न उरकलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मालविका मोहनन सोशल मीडियावर किती अॅक्टिव्ह आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. ती सतत सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चे काही फोटो शेअर केले आणि हे फोटो पाहून तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.
या फोटोंमध्ये ती एकदम पारंपरिक अंदाजात दिसून येत आहे. यामध्ये तिनं फिकट हिरव्या आणि पांढºया रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. मात्र या फोटोमध्ये अभिनेत्रीने आपल्या पायात जोडवी घातलेलं दिसत आहे. तिच्या पायात जोडवी पाहून मालविकाने गुपचूप लग्न केलं का? की एक फॅशन आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
मालविका ही सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफर के यू मोहनन यांची लेक आहे. मल्याळम चित्रपटांची नंबर 1 अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.मालविकाने सन 2013 मध्ये मल्याळम चित्रपटाद्वारे अँक्टिंग डेब्यू केला होता. या चित्रपटाचं नाव होतं ‘नानू मट्टू वरलक्ष्मी’. ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या माजिद मजिदी यांच्या चित्रपटात मालविका मोहनन ही इशान खट्टरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती.
सुपरस्टार विजयच्या ‘मास्टर’ या चित्रपटात मालविका भाव खाऊन गेली होती. सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘पेट्टा’मध्येही तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. मध्यंतरी काही दिवसांपूर्वी मालविकाचे नाव विकी कौशलसोबत जोडलं गेलं होतं. विकीचं हरलीन शेट्टीसोबत ब्रेकअप झाल्यावर त्याच्या आयुष्यात मालविकाने एन्ट्री घेतल्याची चर्चा होती. अर्थात पुढे ही अफवा सिद्ध झाली.