Join us

​ मौनी रायने इतके घटवले वजन की ओळखणेही झाले कठीण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 1:59 PM

टीव्हीच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी लवकरचं अभिनेत्री मौनी राय बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’मध्ये ती दिसणार आहे. तूर्तास ...

टीव्हीच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी लवकरचं अभिनेत्री मौनी राय बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’मध्ये ती दिसणार आहे. तूर्तास मौनी वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, तूर्तास मौनीला ओळखणेही कठीण झाले आहे. मौनीचे ताजे फोटो पाहाल, तर तुम्हालाही हेच दिसेल. एकता कपूरच्या या ‘नागिन’चे ताजे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. यात मौनी बरीच वेगळी भासतेय. याचे कारण म्हणजे, मौनीने घटवलेले वजन.होय, मौनीने बरेच वजन कमी केले आहे आणि यामुळे ती अतिशय सडपातळ दिसू लागलीय. इतकी की, हीच ती मौनी का? असा प्रश्न अनेकांना पडतोय.मौनीने वजन कमी का केले, हे कळायला मार्ग नाही. कदाचित तिला हा नवा लूक आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’साठी असावा, असे मानले जात आहे. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये मौनीची वर्णी लागली आहे.  ‘नागीन’ या मालिकेने घराघरात पोहोचलेली मौनी राय छोट्या पडद्यावरची टॉप अ‍ॅक्ट्रेस मानली जाते. पण गेल्या काही दिवसांत ती बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. आता मौनीवर सलमान खान ‘मेहरबान’ झालाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौनी राय ‘दबंग3’या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसेल.ALSO READ : Photshoot:मौनी रॉयचा पुन्हा दिसला घायाळ करणार अंदाज‘दबंग’चा चुलबुल पांडे आणि ‘दबंग2’मधील रॉबिन हुड पांडे बनलेल्या सलमान खानच्या जुन्या प्रेयसीच्या रूपात ती झळकेल. मौनीचा चित्रपटातील हा सीक्वेंस किमान १५ ते २० मिनिटांचा असेल. मौनी राय ही सलमानच्या गोटातली, सलमानच्या अगदी जवळची मानली जाते. सलमानच्या पार्ट्यांमध्ये कायम मौनी हजर असते. सुरुवातीला सलमान हाच मौनीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार, अशी चर्चा होती. पण सलमानने लॉन्च करण्याआधीच मौनीने अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ साईन केला. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.मौनीने ‘क्योंकी साँस भी बहु थी’ या मालिकेपासून टीव्ही करिअरला सुरूवात केली होती.त्यानंतर ‘जरा नच के दिखा’मध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. ‘देवों के देव महादेव’, ‘बिग बॉस 8’अशा अनेक शोमधून मौनीने स्वत:ची छाप पाडली होती. त्या सगळ्या भूमिकांमुळेच आज मौनीला छोटा पडदा ते रूपेरी पडदा हा पल्ला गाठणे शक्य झाले आहे.