Join us

​शूर्पणखेसारखे तुझेही नाक कापू! करणी सेनेने दिली दीपिका पादुकोणला धमकी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 8:56 AM

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या रिलीजला होत असलेला वाद गंभीर वळण घेत असल्याची चिन्हे आहेत. आता तर या ...

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या रिलीजला होत असलेला वाद गंभीर वळण घेत असल्याची चिन्हे आहेत. आता तर या चित्रपटात लीड रोलमध्ये असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला धमकी देण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली आहे.  लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सैनिकही तुझे नाक कापू शकतात, असे करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी म्हटले आहे.  ‘पद्मावती’ला पूर्वापार विरोध करणाºया राजपूत करणी सेनेने दीपिकाला धमकी दिली आहे. केवळ धमकीच नाही तर सिनेमा प्रदर्शित झाल्यास १ डिसेंबर रोजी भारत बंदचा इशाराही करणी सेनेने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘पद्मावती’चा वाद रंगतो आहे. राजकीय स्तरावरही या चित्रपटाच्या रिलीजला विरोध होऊ लागला आहे. एकीकडे विरोध आणि दुसरीकडे बॉलिवूडचा जोरदार पाठींबा असे स्वरूप या वादाने घेतलेयं. याचदरम्यान काल-परवा या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारणाºया दीपिकाने विरोध करणाºयांना फैलावर घेतले होते. आम्ही खूप मोठी लढाई सुरु केली आहे. काहीही झाले तरी ‘पद्मावती’ सिनेमा ठरलेल्या रिलीज होणारच,  आम्ही केवळ सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत.  या सिनेमाचे प्रदर्शन कोणीही अडवू शकत नाही, असे दीपिका म्हणाली होती. दीपिकाच्या या निर्वाणीच्या भाषेने करणी सेना संतापली आहे.   केवळ राजपूत समाजच नव्हे तर हिंदू आणि मुस्लिमही या सिनेमाच्या विरोधात असल्याचा दावा या संघटनेने केला आहे. या सिनेमाचे ट्रेलर ज्या चित्रपटगृहांत दाखवले जातील, तिथे जाळपोळ करु, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.ALSO READ : ​‘पद्मावती’ रिलीज होणारच! दीपिका पादुकोणने विरोधकांना सुनावले !अलीकडे ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण दिले होते. मी अतिशय प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने ‘पद्मावती’ बनवला आहे. राणी पद्मावतीची कथा मला नेहमीच प्रेरित करत आली आहे. तिचे शौर्य, आत्मबलिदानापुढे मी नतमस्तक होत आलोय. पण काही अफवांमुळे ‘पद्मावती’ला विरोध होत आहे. राणी पद्मावती व अलाऊद्दीन खिल्जी यांच्यावर चित्रपटात कुठलाही प्रेमप्रसंग चित्रीत करण्यात आलेला नाही. मी याआधीही असे कुठले दृश्य चित्रपटात असल्याचा इन्कार केला आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कुणाच्याही भावना दुखावतील, असे काहीही चित्रपटात नाही. चित्रपट साकारताना आम्ही राजपुत घराणेशाहीची मानमर्यादा राखली आहे, असे त्यांनी म्हटले होते.