Join us

‘मक्का’मध्ये मला चुकीचा स्पर्श केला : सोफिया हयात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2017 4:00 PM

​सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉस या वादग्रस्त शोची एक्स कंटेस्टेंट असलेली सोफिया हयात हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक जबरदस्त खळबळ उडवून देणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉस या वादग्रस्त शोची एक्स कंटेस्टेंट असलेली सोफिया हयात हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक जबरदस्त खळबळ उडवून देणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये सोफिया हे सांगताना दिसत आहे की, मक्कामध्ये तिचे लैंगिक शोषण झाले आहे. सोफियाने ज्या पद्धतीचे फोटोज् आणि व्हिडिओज् तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत, त्यावरून ती आणि तिचा होणारा पती त्याठिकाणी गेले असावेत. सोफियाने हा व्हिडिओ शेअर करताना घडलेल्या घटनेचा संपूर्ण वृत्तांत कॅप्शनमध्ये लिहिला आहे. त्यामध्ये म्हटले की, ‘इस्लाममध्ये महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. कोणतीही व्यक्ती आपल्या पत्नी व्यतिरिक्त दुसºया महिलेला स्पर्श करू शकत नाही. त्यामुळेच मला इस्लामविषयी आदर आहे. मात्र ही शिकवण मक्कासारख्या पवित्र ठिकाणी पाळली जात नाही. याठिकाणी येणारा माणूस ही शिकवण विसरून जातो. आज जेव्हा मी ‘पाक पत्थर’(हजरे अस्वद)ला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा मला याची जाणीव झाली की, कोणीतरी व्यक्ती माझ्या मागच्या बाजूने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करीत होता. शिवाय माझ्याशी अश्लीलता करण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याठिकाणी महिलांची रांग नव्हती. कारण पुरुषांनी बळाचा वापर करीत महिलांना धक्के देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महिलांची तिथे रांगच नव्हती.  जेव्हा मी ‘पाक पत्थर’पासून जवळपास १ मीटर दूर होती, तेव्हा मला कोणीतरी जोरात धक्का दिला. त्यामुळे मला श्वास घेणेही अवघड झाले होते. त्यावेळी मी खूपच घाबरली होती. जेव्हा मी मागे वळून बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा नकाब माझ्या गळ्यात अडकला. लोकांच्या धक्क्यांमुळे माझ्या श्वास गुदमरायला लागला. मी जोरजोरात ओरडून मदत मागण्यास सुरुवात केली. सोफियाने पुढे लिहिले की, मी ओरडून मदत मागितल्याने काही चांगले लोक धावून आलेत. त्यांनी मला मदत केली. मात्र, या घटनेमुळे मला प्रचंड हादरा बसला आहे. सोफियाच्या मते, ‘अल्लाहच्या दरबारातदेखील लोकांना कुराणमधील शिकवणीचे भान राहत नाही. महिलांचा अनादर करून आणि ‘पाक पत्थर’चे दर्शन घेऊन जर त्यांना असे वाटत असेल की, आपल्याला जन्नत मिळेल, तर तो त्यांचा निव्वळ गैरसमज आहे.