Join us  

'डकैत'मधील सनी देओलसोबतच्या किसिंग सीनवर मीनाक्षी शेषाद्रीची रिअ‍ॅक्शन, म्हणाली - "हे माझ्यासाठी थोडे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 3:10 PM

Meenakshi Sheshadri : मीनाक्षी शेषाद्रीने ३७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या डकैत या चित्रपटातील सनी देओलसोबतच्या किसिंग सीनवर आता प्रतिक्रिया दिली आहे.

मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Sheshadri) ८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्या काळातील तिच्या चित्रपटांचे आणि अभिनयाचे बॉक्स ऑफिसवर खूप कौतुक झाले. मीनाक्षीने 'पेंटर बाबू'मधून पदार्पण केले, पण तिला खरी ओळख 'हिरो' सिनेमामधून मिळाली. या चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार बनवले. यानंतर मीनाक्षीकडे चित्रपटांची रांग लागली.

मीनाक्षी शेषाद्रीने तिच्या करिअरमध्ये अनिल कपूर, अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले. १९८७ मध्ये रिलीज झालेला 'डकैत' हा तिच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे, ज्यामध्ये तिने सनी देओलसोबत काम केले होते. या चित्रपटात मीनाक्षीचा सनी देओलसोबत किसिंग सीन होता, ज्याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. सनी देओलसोबतचा पहिला चित्रपट करतानाचा अनुभव सांगताना तिने अभिनेत्याच्या स्वभावाबद्दल सांगितले आहे.

सनी देओलने मीनाक्षीला खरंच केलं होतं किस?झूमला दिलेल्या मुलाखतीत मीनाक्षी शेषाद्रीने सांगितले की, ती सनीसोबत किसिंग सीन करताना किती घाबरली होती. ती म्हणाली की, “आम्ही बोटीत असताना एक रोमँटिक गाणे केले आणि गाणे सुरू होण्यापूर्वी त्याने माझे चुंबन घेतले. हे खरोखर एक चुंबन होते. हे माझ्यासाठी थोडे त्रासदायक होते कारण मी खूप पुराणमतवादी आहे.

सनी देओलचा स्वभाव कसा होता?याशिवाय मीनाक्षीने सनी देओलबद्दलही खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली की तो जेंटलमन आहे. सनी देओल इतका सहज होता की त्याच्यासोबत काम करणं सोपं होतं. मीनाक्षी म्हणाली, "सगळं अगदी सहज घडलं आणि मला असं वाटतं की मी त्याच्यासोबत केलेल्या सर्व चित्रपटांमध्ये आमच्यात इतकं चांगलं बाँडिंग आणि समजूतदारपणा होता."

सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली होतीहा सीन करताना मीनाक्षीला नक्कीच थोडं अस्वस्थ वाटलं, पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा हा सीन दाखवला गेला नाही. या दृश्यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली होती. मीनाक्षी आणि सनीने 'दामिनी', 'घायल', 'घातक' यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टॅग्स :सनी देओलमिनाक्षी शेषाद्री