Join us

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय कमबॅक, एकेकाळी प्रेक्षकांच्या हृदयावर केलंय राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 18:03 IST

ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात राहात आहे.

ठळक मुद्देमीनाक्षीने लग्न केल्यानंतर चित्रपटांमध्ये काम न करता तिच्या खाजगी आयुष्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.

मिनाक्षी शेषाद्रीने हिरो, बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला जुर्म आणि दामिनी या चित्रपटांसाठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मिनाक्षीने १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. त्याकाळात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मिनाक्षीची गणना केली जात असे. त्यामुळे तिने बॉलिवूड सोडल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण मीनाक्षीने लग्न केल्यानंतर चित्रपटांमध्ये काम न करता तिच्या खाजगी आयुष्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.

पण आता अनेक वर्षानंतर मिनाक्षीने बॉलिवूडमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. माझी मुलं आता मोठी झाली असून मुलगी नोकरी करत आहे तर मुलगा शिकत आहे.  सध्या अनेक फिल्ममेकर्ससोबत बातचीत सुरू असून माझ्यासाठी अनेक संधी असल्याचं देखील त्यांना सांगितलं आहे, असे मिनाक्षी यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. 

मिनाक्षीचे लग्न हरिश मैसूर यांच्यासोबत झाले असून ते इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. ते परदेशात स्थायिक आहेत. त्याचमुळे मिनाक्षी गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातच राहाते. बॉलिवूडपासून दूर राहून ती आपल्या पतीला आणि कुटुंबियांना वेळ देत आहे. ती अभिनय क्षेत्रात नसली तरी आपली नृत्याची आवड जोपासत आहे.

टॅग्स :मिनाक्षी शेषाद्री