बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि हास्य कलाकार महमूद अली (Mehmood Ali) यांचं पूर्ण कुटुंब हे मनोरंजन विश्वाशी जोडलेले होते. त्यांची बहीण मीनू मुमताज (Meenu Mumtaz) प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री. त्यांनी 1950 आणि 60 च्या दशकात अनेक हिंदी सिनेमात काम केलं. अभिनेत्रीसोबतच डान्सर म्हणूनही मी म्हणूनही त्यांना प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धी मिळवूनही एका कारणाने त्यांनी जनतेचा रोष ओढवून घेतला होता. काय होतं ते कारण बघुया.
मीनू मुमताज यांचं करिअर यशाच्या शिखरावर असतानाच त्यांना 'हावडा ब्रिज' या सिनेमाची ऑफर आली. 1958 साली आलेल्या या सिनेमाने देशभरात खळबळ माजली. यामध्ये मीनू मुमताज यांनी आपला सख्खा भाऊ महमूद सोबत चक्क रोमान्स केला होता. होय, त्या काळी लोकांचा संताप झाला होता. सख्ख्या भाऊ बहिणीला ऑनस्क्रीन रोमान्स करताना पाहून लोक भडकले होते.
1955 साली 'घर घर दिवाली' सिनेमातून मीनू मुमताज यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. यानंतर 'सखी हातिम', 'ब्लॅक कॅट', 'चौधविन का चाँद', 'साहिब बीबी और गुलाम', 'ताजमहल', 'गजल' असे अनेक हिट सिनेमे दिले.
12 जून 1963 रोजी त्यांनी दिग्दर्शक एस अली अकबर यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर वर्षभराने त्या फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेल्या. 23 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांचं निधन झालं. शेवटच्या काळात त्यांना ट्यूमर आणि नंतर कॅन्सरचेही निदान झाले होते. ज्यामुळे त्यांची तब्येतच आणखी खालावली होती.