Join us  

पहिल्या प्रेग्नंसीवेळी होता मिसकॅरेजचा धोका, डॉक्टरही म्हणाले, 'हा तर चमत्कार'; मीरा राजपूतचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 12:52 PM

मीराने वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्या बाळाला जन्म दिला होता.

शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि पत्नी मीरा राजपूत (Meera Rajput) हे बॉलिवूडमधलं आदर्श कपल आहे. त्यांना मीशा आणि झैन ही दोन मुलं आहेत. मीरा अभिनय क्षेत्रात नसली तरी ती इतर व्यवसाय, सामाजिक कार्यात व्यस्त असते. फॅशन शोमध्येही ती सहभागी होते. मीराने 2016 साली मीशाला जन्म दिला. मीरा प्रेग्नंट असताना तिला मिसकॅरेजचा धोका होता असा खुलासा तिने केला आहे. 

मीरा राजपूतचा Akind हा स्किनकेअर ब्रँड आहे. नुकतंच ब्रँडच्या प्रमोशनसाठी ती एका पॉडकास्टमध्ये आली होती. यावेळी तिने पहिल्या प्रेग्नंसीचा अनुभव सांगितला. मीरा म्हणाली, "मी चार महिन्यांची गरोदर असताना माझं मिसकॅरेज होण्याची शक्यता होती. डॉक्टरांनी मला या धोक्याची जाणीव करुन दिली होती. सोनोग्राफीमध्ये माझं गर्भाशय फाटल्याचं समोर आलं होतं. कोणत्याही क्षणी मी बाळ गमावणार होते. यामुळे शाहीद आणि मी चिंतेत होतो. माझं मानसिक स्वास्थ्यही बिघडलं. मी अडीच महिने रुग्णालयातच होते. मला घरी जाण्याची इच्छा होती. शाहिदने डॉक्टरांशी चर्चा करुन घरीच रुग्णालयासारखं वातावरण तयार केलं."

ती पुढे म्हणाली, "मी घरी पोहोचले तेव्हा कुटुंबियांनी मला छान सरप्राईज दिलं. पण मला लगेच कॉन्ट्रॅक्शन्स सुरु झाले त्यामुळे परत रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. काही दिवसांनी मी पुन्हा घरी आले तेव्हा शाहिदने माझी खूप काळजी घेतली. 26 ऑगस्टला मी मीशाला जन्म दिला. तेव्हा डॉक्टर म्हणाले हे काही चमत्कारपेक्षा कमी नाही."

जुलै 2015 मध्ये शाहीद आणि मीरा लग्नबंधनात अडकले होते. तर ऑगस्ट  2016 मध्ये तिने मीशाला जन्म दिला. पहिल्या प्रेग्नंसीवेळी मीरा फक्त २२ वर्षांची होती. मीशाच्या जन्मानंतर दोनच वर्षात 2018 साली मीराने झैन ला जन्म दिला.

टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूडमीरा राजपूतपरिवारप्रेग्नंसी