मीरा राजपूतने सांगितले पती शाहिद कपूरचे बेडरूम सीक्रेट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 4:20 PM
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे दाम्पत्य नेहमीच चर्चेत असते. मीरा आणि शाहिदने रॅम्पवॉक करून ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे दाम्पत्य नेहमीच चर्चेत असते. मीरा आणि शाहिदने रॅम्पवॉक करून चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. नुकतेच हे दाम्पत्य नेहा धुपियाच्या ‘बीएफएफ विद वोग्स’ या टॉक शोमध्ये सहभागी झाले होते. शोमध्ये मीराने तिच्या लव लाइफशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला. शोच्या स्केअरी स्पाइस सेग्मेंटमध्ये होस्ट नेहा धुपियाने मीराला, बेडवर त्याची आवडती पोझिशन काय आहे? असा प्रश्न विचारला. शाहिदने या प्रश्नाचे उत्तर न देताच पुढचा प्रश्न विचारण्यास सांगितले. परंतु मीराने या प्रश्नाचे उत्तर दिले. तिने म्हटले की, ‘मला असे वाटते की, शाहिद कंट्रोल फ्रीक आहे.’ वास्तविक पहिल्यांदाच मीराने तिच्या लव लाइफविषयी खुलासा केला असे नाही. या अगोदरही तिने तिच्या लव लाइफवर बिंधास्त बोलणे पसंत केले. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ शोमध्ये तिने अशाप्रकारच्या प्रश्नांवर बिंधास्तपणे उत्तरे दिली होती. मीराचे उत्तरे ऐकून करण जोहरलाही धक्का बसला होता. करणने मीराला शाहिदच्या एक्स गर्लफ्रेंड्सबद्दलही विचारले होते. करणने शाहिदला म्हटले होते की, तू चौथ्यांदा लकी ठरला. ज्यावर शाहिदने म्हटले होते, ‘तू एवढाच आकडा लक्षात ठेवलास काय?’ यानंतर मीराने पती शाहिदच्या बाजूने बोलताना म्हटले होते की, ‘आम्ही एकमेकांबद्दल सर्वकाही जाणून आहोत.’ असो असेच काहीसे खुलासे मीराने नेहाच्या शोमध्येही केले. नेहाने मीराला विचारले की, कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटीला नव्या स्टाइलिस्टची गरज आहे? असे विचारले. त्याचे उत्तर देताना मीराने विद्या बालनचे नाव घेतले. दरम्यान, मीरा जरी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी ती नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांनी चर्चेत असते. मुलगी मीशाबरोबर ती नेहमीच स्पॉट होत असते. त्याचबरोबर अनेक टॉक शोमध्ये ती पती शाहिदसोबत हजेरी लावत असते. मीराला बिंधास्त बोलण्यासाठी ओळखले जाते. कोणत्याही प्रश्नावर ती अगदी बिंधास्तपणे उत्तर देणे पसंत करते. असाच काहीसा प्रत्यय नेहाच्या या शोमध्ये बघावयास मिळाला.