Join us

रिषभ पंतवरुन ट्रोल करणाऱ्यांना मीरा रौतेलांचं सडेतोड उत्तर, रुबाबदार फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 6:50 PM

रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्याबद्दल अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतचा शुक्रवारी पहाटे अपघात झाला. रस्ते अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यावर आता मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रिकेटपासून ते बॉलीवूड आणि राजकीय जगतातील सेलिब्रिटींनीही तो लवकरात लवकर तंदुरूस्त व्हावा, यासाठी सदिच्छा आणि प्रार्थना केल्या. विशेष म्हणजे उर्वशी रौतेलाची आई मीरा यांनीही प्रार्थना केली होती. त्यावेळी, नेटीझन्सने मीरा यांना ट्रोल केलं होतं. आता, मीरा यांनी ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिलं आहे.

रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्याबद्दल अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. याच दरम्यान, उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला यांना रिषभ पंतबद्दल इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. नेटीझन्सने मीरा यांना ट्रोल केलं. मात्र, मीरा यांनीही नेटीझन्सन सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. 

रिषभ पंतच्या प्रकृतीसाठी बॉलिवूड जगतापासून ते राजकीय दिग्गजांपर्यंत सर्वांनीच प्रार्थना केली आहे. त्याचवेळी, उर्वशी रौतेलाची आई मीरा यांनीही रिषभच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होण्यासाठी पोस्ट केली होती. त्यावर, नेटीझन्से ट्रोल केल्यानंतर आता पुन्हा एकदा मीरा यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्याद्वारे ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिलंय. मीराने इंस्टा अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये, मीरा या राजा-महाराजांसारख्या खुर्चीत बसल्याचं दिसून येत आहे. 'जर स्वत:चं मुल्य समजून येत असेल तर दुसऱ्यांकडून होणाऱ्या टिका आपल्याला स्पर्शही करु शकत नाहीत', असे कॅप्शन मीरा यांनी दिले आहे. मीरा यांनी कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे ट्रोलर्संना सुनावले आहे. या पोस्टवरही नेटीझन्स कमेंट करत आहेत.  

टॅग्स :रिषभ पंतउर्वशी रौतेलासोशल मीडियाइन्स्टाग्राम