Join us

बिल्लू उस्ताद येणार १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 5:36 AM

बिल्लू उस्ताद` हा दहशतवादी कृत्यांसाठी लहान मुलांचा केला जाणारा गैरवापर या अत्यंत गंभीर विषयावर बेतलेला भारतातला पहिलाच चित्रपट १६ ...

बिल्लू उस्ताद` हा दहशतवादी कृत्यांसाठी लहान मुलांचा केला जाणारा गैरवापर या अत्यंत गंभीर विषयावर बेतलेला भारतातला पहिलाच चित्रपट १६ फेब्रुवारी रोजी सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्यासाठीसज्ज झाला आहे.चित्रपटाचे दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांनी सांगितल्याप्रमाणे, या चित्रपटातला लहानगा बिल्लू अत्यंत शूर असून स्वतः दहशतवाद्यांशी दोन हात करून इतर मुलांनाही या भयंकर परिस्थितीतून सोडवण्यासाठी तोशर्थीने प्रयत्न करतो. हा हिंदी चित्रपट लहानग्या प्रेक्षकांना स्वसंरक्षणाचे धडे देणार आहे.या चित्रपटाची निर्मिती शंतनू सिंग यांनी केली असून कैलाश खेर आणि वैशाली सामंत यांनी यातील अत्यंत सुरेल गाण्यांना आपला स्वर दिला आहे. या चित्रपटाला श्रीरंग आरस यांनी संगीत दिले आहे. अनाथालयांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांचे ब्रेन वॉशिंग करून त्यांना अत्यंत घातक अशा दहशतवादी कृत्यांमध्ये गोवण्याचा ट्रेण्ड सध्या सुरू असून हाच या चित्रपटाचा आशय आहे. सार्वजनिक ठिकाणी जीवंतबॉम्ब सोबत बाळगून दहशत निर्माण करण्यासाठी काही अनाथ मुलांवर दबाव निर्माण करणाऱ्या एका दहशतवादी संघटनेची ही कथा आहे.बिल्लू... अशाच एका अनाथालयात राहणारा एक मुलगा. मानवतेविरूद्धची घातक कृत्ये करण्यासाठी अनाथालयातल्या काही मुलांना दहशतवादी संघटनांनी तयार केले असून त्या मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा लहानगा बिल्लू महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला मदत करतो, असे सुवदन यांनी सांगितले. ``या चित्रपटात बुऱ्हाण वाणी या गेल्या वर्षी काश्मिर येथे मारल्या गेलेल्या आणि पाकिस्तानकडून हुतात्मा म्हणून घोषित केलेल्या दहशतवाद्याचे पात्रही रंगवण्यात आले आहे. अनाथाश्रम या दहशतवादीकृत्यांमध्ये कशाप्रकारे गोवले जाते आणि एटीएस टीम्स या लहान मुलांना कशाप्रकारे वाचवतात, हे या चित्रपटात फारच रोमांचकारी पद्धतीने दाखवण्यात आले आहे,`` असे निर्माता शंतनू सिंग यांनी सांगितले. अनाथालयातील मुलांना मानवताविरोधी कारवायांसाठी जुंपले गेले आहे, हे महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला पटवून देत दहशतवादी संघटनांच्या तावडीतील  मुलांनापुन्हा मुख्य  प्रवाहात आणण्यासाठी याच अनाथालयात राहणारा बिल्लू पोलिसांची मदत करतो, असे सुवदन यांनी सांगितले.भारत व परदेशात दहशतवाद पसरवण्यासाठी ठिकठिकाणच्या लहान मुलांना आपल्या जाळ्यात ओढणारे अनेक जिहादी समुह जगभरात कार्यरत आहेत, यावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. काश्मिरचे दहशतवादामुळे प्रचंड नुकसान झाले असल्याचेही चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.२६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पुणे एटीएस शाखेचे प्रमुख भानुप्रताप बर्गे यांच्या कामातून या चित्रपटासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करणारे पाकिस्तान हे मुख्य केंद्र बनले असून मानवतेविरुद्धही हे राष्ट्र गुन्हेगार ठरते, असा भारत सरकारचा दावाही या चित्रपटात नमूद करण्यात आला आहे.बिल्लू या प्रमुख भूमिकेत बालकलाकार मिहीर सोनी आपल्यासमोर येणार असून यापूर्वी मिहीर याने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'कुटुंब' या चित्रपटात काम केले आहे. 'बिल्लू उस्ताद' याचित्रपटातील अन्य भूमिकांतील कलाकारांमध्ये प्रियांशू चटर्जी, अखिलेंद्र मिश्रा, मिथीला नाईक, नील बक्षी, अथर्व नेर्लेकर, राखी, साईश आरासकर, दीपराज राणा, स्नेहा अरूण आणि के. के. गोस्वामी यांचासमावेश आहे.