Join us

Ganesh Utsav 2021: लालबागच्या राजाची पहिली झलक; बिग बींनी शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 1:03 PM

Lalbaugcha raja : बिग बींनी इन्स्टाग्रामवर लालबागच्या राजाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हळूहळू पडदा वर जात लालबागच्या राजाची छान सुंदर, सुबक अशी मुर्ती दिसून येत आहे.

ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर लालबागच्या राजाची पहिली झलक शेअर केली आहे

देशात सध्या गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी गणरायाचं आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव म्हटलं की मुंबईतील काही मानाच्या गणपतींचा निराळाच थाट पाहायला मिळतो. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव अनेक शहरांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यातच मुंबईतील लालबागच्या राजावर अनेकांची श्रद्धा असून त्याची पहिली झलक सर्वांसमोर आली आहे. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर लालबागच्या राजाची पहिली झलक दाखविली आहे.

बिग बींनी इन्स्टाग्रामवर लालबागच्या राजाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हळूहळू पडदा वर जात लालबागच्या राजाची छान सुंदर, सुबक अशी मुर्ती दिसून येत आहे. "ॐ गण गणपतये नमः .. Ganpati Bappa Morya .. पहला दर्शन, लालबागचा राजा", अशी कॅप्शन बिग बींनी या व्हिडीओला दिली आहे. बिग बींनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. 

दरम्यान,  सध्या कोरोना काळात सुरु असल्यामुळे यंदा भाविकांना ऑनलाइन माध्यमातून लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावं लागणार आहे. लालबागच्या राजाची स्थापना १९३४ पासून चिंचपोकळी येथे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा नवसाला पावणारा बाप्पा अशीही लालबागच्या राजाची ओळख आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनगणेशोत्सव विधीलालबागचा राजा