Join us  

बऱ्याच वर्षांनी दिसली गुलजार-राखीची जोडी, लेक मेघनाने शेअर केला आईवडिलांचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 4:23 PM

नुकतंच मेघनाने आईवडिलांचा एकत्रित फोटो शेअर केला. यामध्ये अनेक दिवसांनी अभिनेत्री राखीला पाहून चाहतेही भारावले.

मेघना गुलजार (Meghna Gulzar) ही बॉलिवूडमधली प्रतिभाशाली दिग्दर्शिका आहे. विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हा सिनेमा तिनेच दिग्दर्शित केला होता. याशिवाय 'राजी', 'छपाक', 'तलवार' असेही काही सिनेमे तिने केले. मेघना प्रसिद्ध गीतकार, लेखक गुलजार आणि अभिनेत्री राखी यांची मुलगी आहे. नुकतंच मेघनाने आईवडिलांचा एकत्रित फोटो शेअर केला. यामध्ये अनेक दिवसांनी अभिनेत्री राखीला पाहून चाहतेही भारावले.

गुलजार (Gulzar) आणि अभिनेत्री राखी (Rakhee) 1973 साली लग्नबंधनात अडकले होते.त्याचवर्षी राखीने मेघनाला जन्म दिला. मात्र एका वर्षातच 1974 साली त्यांचा घटस्फोट झाला. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री राखी यांच्या बदललेल्या लूकने चाहत्यांना चिंतेत पाडलं होतं. एकाएकी राखी सिनेसृष्टीपासून दूर झाल्या होत्या. मात्र आता बऱ्याच वर्षांनी राखी आणि गुलजार एकत्र दिसत आहेत. मेघनानेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये राखी, गुलजार यांच्यासोबत मेघनाचे पती आणि मुलगा दिसत आहे. 'सकाळी पाऊस सुरु असताना चहा, समोसे असा नाश्त्याचा आनंद घेणं हे काही औरच' असं कॅप्शन तिने दिलं आहे. 

मेघनाने शेअर केलेल्या या फोटोवर गायिका रेखा भारद्वाज यांनी 'माशाल्लाह' अशी कमेंट केली आहे. तसंच विक्रांत मेस्सी आणि शिल्पा तुळसकर या कलाकरांनीही कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. बरेच वर्षांनी गुलजार आणि राखी यांना सोबत पाहून चाहतेही खूश झालेत. 

टॅग्स :गुलजारबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया