Meri Husband Ki Biwi: अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अलिकडेच त्याची सिंघम अगेन या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चा होती. सिंघम अगेनच्या यशानंतर तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. सध्या हिंदी सिनेसृष्टीत अर्जुन कपूरच्या आगामी 'मेरी हसबंड की बिवी' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अर्जुन कपूरसह अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Pret Singh) यांच्या मुख्य भूमिका आहेत.नुकताच 'मेरी हसबंड की बिवी' या रोमकॉम चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'मेरी हसबंड की बिवी' च्या ट्रेलरमध्ये कॉमेडी आणि धमाल पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर अनेक दिवसांनी अर्जुन कपूर प्रेक्षकांना रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. मुदस्सर अजीझ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.
'मेरी हसबंड की बिवी' हा सिनेमा नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणार आहे. 'लव्ह ट्रँगल नही सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. जॅकी भगनानी आणि वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केलीय. २१ फेब्रुवारी २०२५ ला हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अर्जुन कपूर कशी कमाल करणार? सिनेमा सुपरहिट होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.