Join us

'मेरे हसबंड की बीवी' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 09:46 IST

'लव्ह ट्रँगल नही फूल सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. 

Mere Husband Ki Biwi OTT Release: अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून अभिनेता अर्जून कपूरने (Arjun Kapoor) प्रेक्षकांना थक्क केलं. आता अर्जुन कपूर आणखी एक नवा चित्रपट घेऊन आला आहे. पण, या सिनेमात तो खलनायक नाही तर दोन सुंदरींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 

 'मेरे हसबंड की बीवी' असं या चित्रपटाचं नाव आहे. अर्जुन कपूरसोबत अभिनेत्री रकुल प्रीत (Rakul Pret Singh)  आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) पाहायला मिळणार आहेत.  हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट येत्या २१ फेब्रुवारी २०२५ रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होईल, असं वृत्त एनडीटीव्हीनं प्रकाशित केलं आहे. 

'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटाची निर्मिती पूजा फिल्म्सने केली आहे. तर मुदस्सर अजीझ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'लव्ह ट्रँगल नही फूल सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. 

चित्रपटात भूमीला एक्स वाईफच्या भूमिकेत तर रकुलला होणारी पत्नी म्हणून दाखवण्यात आलं आहे. दोन्ही अभिनेत्री पूर्ण ताकदीने अर्जुनच्या मागे लागल्या आहेत. तर या दोघींमध्ये अर्जुन कपूर कैचीत सापडलेला दिसतो. दोघींनाही अर्जुनला मिळवायचं आहे. आता अशा परिस्थितीत, शेवटी अर्जुनची पत्नी कोण होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटात पाहावा लागणार आहे.  

टॅग्स :अर्जुन कपूरभूमी पेडणेकर रकुल प्रीत सिंग