आज सगळीकडे ख्रिसमसचं जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. जगभरातील माणसं आज ख्रिसमसचं जोरदार सेलिब्रेशन करत आहेत. अशातच बॉलिवूडमधील सर्वांची लाडकी राहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तुम्हाला आठवत असेल तर, रणबीर-आलियाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच राहाला पहिल्यांदा मीडियासमोर आणलं होतं. आता पुन्हा एकदा २०२४ च्या ख्रिसमसमध्ये रणबीर-आलियाने राहाला सर्वांसमोर आणलंय. यावेळी राहा पहिल्यांदा मीडियासमोर बिनधास्त बोलताना दिसली.
राहाचा क्यूट व्हिडीओ व्हायरल
रणबीर-आलियाचा व्हिडीओ विरल भयानीने शेअर केलाय. या व्हिडीओत पहिल्यांदा आलिया सर्व मीडियाला गोंगाट करु नका, म्हणून विनंती करताना दिसते. पुढे रणबीर त्याच्या कडेवर राहाला सर्वांसमोर घेऊन येतो. राहा मीडियाला पाहताच हात हलवत "हाय, मेरी ख्रिसमस" असं म्हणताना दिसते. राहाच्या या क्यूट बोलण्याने रणबीर-आलियालाही सुखद धक्का बसतो. पुढे मीडिया फोटो - व्हिडीओमुळे राहावर फ्लॅश मारते. त्यामुळे राहा तोंड खाली करताना दिसते.
जाताना राहाने सर्वांना दिलं फ्लाइंग किस
अशाप्रकारे राहाच्या क्यूट वागण्याने सर्वांना चांगलंच सरप्राइज केलं. फोटोशूट झाल्यावर रणबीर-आलियाला राहाला गाडीत घेऊन जाताना दिसतात. तेव्हा सर्वजण राहाला बाय करताना दिसतात. राहा सुद्धा सर्वांना बाय म्हणत फ्लाइंग किस देताना दिसते. राहाच्या या क्यूट व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. गेल्या वर्षभरात राहा रणबीर-आलियासोबत अनेक फंक्शनमध्ये दिसली. रणबीर-आलिया सुद्धा लाडक्या लेकीसोबत फोटोशूट करताना दिसतात.