MET GALA 2018 : प्रियांका चोप्रा पुन्हा तिच्या ड्रेसवरून झाली ट्रोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 02:27 PM2018-05-09T14:27:01+5:302018-05-09T19:57:15+5:30

देसी गर्ल प्रियांका चोप्रा मेट गाला २०१८ मध्ये रेड कार्पेटवर अतिशय हटके अंदाजात बघावयास मिळाली. मात्र तिच्या या अंदाजामुळेच ती नेटिझन्सच्या निशाण्यावर आली.

MET GALA 2018: Priyanka Chopra again showed her troll! | MET GALA 2018 : प्रियांका चोप्रा पुन्हा तिच्या ड्रेसवरून झाली ट्रोल!

MET GALA 2018 : प्रियांका चोप्रा पुन्हा तिच्या ड्रेसवरून झाली ट्रोल!

googlenewsNext
लिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा दुसºयांदा मेट गाला २०१८ च्या रेड कार्पेटवर आपले जलवे दाखविताना दिसली. यावेळेस तिने राल्फ लॉरेनने डिझाइन केलेला वेलवेट ट्रेन गाउन परिधान केला होता. या गाउनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. परंतु काही लोकांना तिचा हा लूक अजिबातच पसंत आला नाही. त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तर तिची तुलना डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार्सशी केली आहे. 



खरं तर प्रियांकाने मेट गाला २०१८ ची 'Heavenly Bodies: Fashion and the Catholic Imagination' ही थीम फॉलो करताना अशा प्रकारचा ड्रेस परिधान केला होता. परंतु या आउटफिटमुळे ती चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर तर तिचे मीम बनविले जात आहेत. उपलब्ध माहितीनुसार, प्रियांकाचा हा ड्रेस बनविण्यासाठी तब्बल २५० तास लागले. डिझायनरने स्वत: सागिंतले की, या कस्मट गाउनची एम्ब्रॉयडरी हाताने बनविण्यात आली आहे. त्याचबरोबर असेही सांगितले जात आहे की, हा गाउन जिझसशी प्रेरित आहे. मात्र चाहत्यांना प्रियांकाचा हा अंदाज अजिबातच पसंत आला नाही. 
 

अनेकांनी तर तिच्या ड्रेसची तुलना चक्क डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार स्कॉट स्टेनरशी केली आहे. गेल्यावर्षीदेखील प्रियांका तिच्या भल्यामोठ्या गाउनमुळे चर्चेत आली होती. ट्रोलर्सनी तिची खिल्ली उडविण्याची एकही संधी यावेळी सोडली नव्हती. आता पुन्हा एकदा ती ट्रोलर्सला बळी पडताना दिसत आहे. दरम्यान, या इव्हेंटमध्ये मस्तानी दीपिका पादुकोणही सहभागी झाली होती. रेड कार्पेटवर तिचा अंदाज बघण्यासारखा होता. 
 

Web Title: MET GALA 2018: Priyanka Chopra again showed her troll!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.