#MeToo मोहिमे अंतर्गत रोज एक नवे प्रकरण समोर येते आहे. क्वीन सिनेमासाठी नॅशनल अॅवॉर्ड जिेंकलेला दिग्दर्शक विकास बहलवर #MeToo मोहिमे अंतर्गत कंगना राणौत आणि फँटममध्ये काम करत असलेल्या महिल्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.
आता या प्रकरणावर ऋतिक रोशनने वक्तव्य केले आहे. विकास बहलवर ऋतिक रोशनचे वक्तव्य यासाठी महत्त्वाचे आहे कारण तो त्याच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. सुपर 30 सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीनंतर अभिनेता ऋतिक रोशनने देखील त्याची साथ सोडली आहे. ऋतिकने लिहिले आहे की, माझ्यासाठी असा कोणत्याही व्यक्तीसोबत काम करणे असंभव आहे ज्यांने वाईट कृत्य केले असेल. मी या सगळ्यापासून लांब आहे आणि या प्रकरणाची मला थोडी फार माहिती आहे.
पुढे ऋतिक म्हणाला आहे, मी सुपर 30 च्या निर्मात्यांना विनंती केली आहे की, या प्रकरणाची सर्व माहिती काढून शक्य तितकी मोठी कारवाई करावी. दोषीला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि सर्व पीडित महिलांच्या मागे उभे राहून त्यांना साथ देण्याची गरज आहे.
सुपर 30 हा विकास बहलच्या महत्त्वपूर्ण सिनेमांपैकी एक आहे. हा सिनेमा गणित तज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर विकासला अमेझॉन प्राईमच्या वेब सीरीजमधून देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता सुपर 20 चे निर्माते विकास बहललावर कोणती कारवाई करतात, त्याला सिेनमातून बाहेरचा रस्ता दाखवतात का ?, हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.