Join us

#MeToo: या मोहीमेकडे गांभीर्याने बघितले पाहिजे - कल्की कोचलिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 19:15 IST

अभिनेत्री कल्की कोचलिनने देखील मीटू मोहिमेचे समर्थन केले आहे.

ठळक मुद्देमीटू मोहिमेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे - कल्की

मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील महिला लैंगिक शोषण व अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. या मोहिमेला बॉलिवूडमधील कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री कल्की कोचलिनने देखील मीटू मोहिमेचे समर्थन केले आहे. तिने या मोहिमेमुळे देश व जगभरात महिलांवरील लैंगिक शोषण व अत्याचार समोर येत आहेत आणि ही खूप चांगली बाब असल्याचे म्हटले आहे. 

कल्की कोचलिनने स्मोक या तिच्या वेबसीरिजच्या मुलाखतीच्या वेळी मीटू मोहिमेवर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, या मोहिमेकडेे गांभीर्याने पाहिले पाहिजे व ऐकले पाहिजे. याबाबतची जनजागृती वाढते आहे. या मोहिमेमुळे देश व जगभरात महिलांवरील लैंगिक शोषण व अत्याचार समोर येत आहेत. अशा मोहिमेची खूप गरज आहे. या मोहिमेअंतर्गत माझे कित्येक प्रोजेक्ट थांबले आहेत. पण, जर काही गोष्टी आता सुधारल्या नाही तर खूप उशीर होईल. काही गोष्टी आज बदलण्याची गरज आहे. मीटूसारख्या गोष्टी जर आपल्याला संवेदनशील बनवत असतील, तर खूप चांगली बाब आहे.

पुढे कल्कीने सांगितले की, चित्रपटसृष्टी आता सर्व महिलांना सुरक्षित वाटेल अशापद्धतीने काम करणार आहे. ही खूप मोठी बाब असून उशीरा का होईना पण, योग्य काम करत आहोत.

टॅग्स :कल्की कोचलीनमीटू