Join us

#MeToo: विकास बहलविरोधातील ट्विटमुळे हंसल मेहता झाले ट्रोल, सोडले ट्विटर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 8:59 PM

बॉलिवूडचे एक बडे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेची बाजू घेतली. ‘या हिन माणसाविरूद्ध कुणी काही करणार?’, असा सवाल त्यांनी केला. पण याचा परिणाम म्हणजे, हंसल मेहता यांना यानंतर अतिशय वार्ईट पद्धतीने ट्रोल केले गेले.

दिग्दर्शक विकास बहल याच्यावर त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसच्या एका महिलेने गैरवर्तनाचा आरोप केला आहे. २०१५ मध्ये विकास बहलने आपल्यासोबत गैरवर्तन केले होते, असा तिचा आरोप आहे. ‘हफिंग्टन पोस्ट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत या महिलेने विकास बहलवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची तक्रार आपण ‘फँटम फिल्म्स’चे अनुराग कश्यप व आदींकडे केली होती. पण त्यांनी याची दखल घेतली नाही, असाही या महिलेचा आरोप आहे. या महिलेच्या आरोपानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिनेही या महिलेला पाठींबा दिला आहे. ही महिला खरे बोलतेय, यावर माझा विश्वास आहे. कारण विकास बहलबाबत मलाही असाच काहीसा अनुभव आला आहे, असे कंगनाने म्हटले. कंगनानंतर बॉलिवूडचे एक बडे दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेची बाजू घेतली. 

‘या हिन माणसाविरूद्ध कुणी काही करणार?’, असा सवाल त्यांनी केला. पण याचा परिणाम म्हणजे, हंसल मेहता यांना यानंतर अतिशय वार्ईट पद्धतीने ट्रोल केले गेले. या ट्रोलिंगमुळे हंसल मेहता इतके वैतागले की, त्यांनी ट्विटरलाच रामराम ठोकला. ट्विटर सोडताना ,‘मी एका गोष्टीवर माझे मत मांडले आणि त्यामुळे मला ट्रोल व्हावे लागले. या प्लॅटफॉर्मवर लोक नकारात्मकता पसरवत आहेत. मी माझे विचार मांडणे थांबवणार नाही़ ते मी यानंतरही मांडणार, पण इथे नाही,’असे हंसल मेहता यांनी लिहिले.