Join us

#MeToo : मंदाना करिमीने ‘क्या कूल है हम 3’च्या दिग्दर्शकाबद्दल केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 8:54 PM

अभिनेत्री मंदाना करिमी हिने ‘क्या कूल है हम 3’ फेम दिग्दर्शक उमेश घाडगेवर गंभीर आरोप केला आहे. 

तनुश्री दत्ताने अनेक महिलांना लैंगिक छळ, शोषण व गैरवर्तनाबद्दल बोलण्याचे बळ दिले. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेचे वादळ उठले आहे. या वावटळीत अनेक बड्या बड्या व्यक्तिंचे मुखवटे गळून पडले आहेत. आता अभिनेत्री मंदाना करिमी हिने ‘क्या कूल है हम 3’ फेम दिग्दर्शक उमेश घाडगेवर गंभीर आरोप केला आहे. 

‘क्या कूल है हम 3’ च्या शूटींगदरम्यान दिग्दर्शक उमेश घाडगेने मला प्रचंड त्रास दिला. त्या एकाच चित्रपटाने मला इतका कटू अनुभव दिला की, मला अतिशय प्रिय असलेले हे प्रोफेशन सोडावे लागले. माझे इतके शोषण झाले की, माझे आयुष्य नरकाहूनही वाईट झाले. त्यादिवसांत मी खूप काही भोगले. पण मी हे कुणालाच सांगितले नाही. उमेश घाडगे गाणे शूट होत असताना अचानक ‘लास्ट मिनट चेन्ज’च्या नावावर माझ्या स्टेप्स बदलायचा. मला सेटवर कितीतरी आधी बोलवून जे माझे नसायचे असे कपडे ट्राय करायला लावायचा. मला तासन तास शूटसाठी प्रतीक्षा करावी लागायची, असे मंदानाने सांगितले.‘हमशक्ल’च्या सेटवर साजिद खानचा एक किस्साही तिने शेअर केला. एकदा मला साजिद खानच्या आॅफिसमधून फोन आला. आम्ही तुझी फिल्म पाहिली आहे. पण आम्हाला तुझी बॉडी बघायची आहे. कपड्याशिवाय तुझी बॉडी कशी दिसते, ते आम्हाला पाहायचे आहे, असे पलीकडची व्यक्ती म्हणाली. हे ऐकल्यानंतर मी आणि मॅनजर हसू लागलो. हे वेडे तर नाहीत ना, असा प्रश्न आम्हाला पडला होता, असेही तिने सांगितले.

टॅग्स :मीटू