Join us

#MeToo: सचिन-जिगरची जोडीही सापडली ‘मीटू’च्या वावटळीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 8:17 PM

बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेचे वादळ आणखी जोरात घोंघावू लागले असताना आता एक संगीतकार जोडीही ‘मीटू’च्या वावटळीत सापडली आहे.

बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेचे वादळ आणखी जोरात घोंघावू लागले असताना आता एक संगीतकार जोडीही ‘मीटू’च्या वावटळीत सापडली आहे. होय, क्या सुपर कूल है हम, ओह माय गॉड, एबीसीडी, गो गोवा गॉन, शुद्ध देसी रोमान्स, हॅपी एन्डींग, बदलापूर, हिंदी मीडियम, राबता, परमाणु, गोल्ड, स्त्री अशा अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत देणाा-या सचिन-जिगर अर्थात सचिन सांघवी आणि जिगर सरैया या संगीतकार जोडीवर दोन वेगवेगळ्या गायिकांनी लैंगिक गैरवर्तनाचा आरोप ठेवला आहे. आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर एका गायिकेने बॉम्बे टाईम्सला  जिगरबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केलेत. ‘मी त्याकाळात स्ट्रगल करत होते. पण तरिही एक पैसाही न घेता गात होते. त्या काळात स्क्रेच गीत गाण्यासाठी मला रात्री-बेरात्री बोलवण्यात येत होते. याकाळात सचिन-जिगरसोबतही मी काम केले. पण त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव भयावह होता. तो असे काही बोलायचा की, ते सगळे सहन करणे मला असह्य व्हायचे. एकदा जिगरने बळजबरीने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तुला बघितले की, मला तुला किस करण्याची अनावर इच्छा होते, असे तो मला म्हणाला. अनेकदा मनाई करूनही जिगर रात्री-बेरात्री पाच मिनिटांसाठी भेटायला ये असे म्हणून मला फोन करायचा,’ असे या गायिकेने सांगितले.अन्य एका गायिकेन सचिन सांघवीवर आरोप केलेत. तिने सांगितले की, एकदा मी गाण्याचे रेकॉर्डिंग करत असताना सचिन माझ्या जवळ आला आणि माझ्याशी लगट करू लागला. तुला बघतो तेव्हा मला तुझ्या जवळ येण्याची इच्छा होत. मला जगाची पर्वा नाही, मी तुझ्यावर प्रेम करू इच्छितो, असे तो मला म्हणाला.सचिन-जिगरने अद्याप या आरोपांना कुठलेही उत्तर दिले नाही़ आता यावर ही जोडी काय खुलासा करते, ते बघूच. 

टॅग्स :मीटू