‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारा दिग्दर्शक साजिद खान याच्यावर आणखी एका अभिनेत्रीने आरोप ठेवला आहे. होय, जॉनी गद्दार या चित्रपटाची अभिनेत्री प्रियंका बोस हिने साजिदवर अश्लिल चाळे केल्याचा आरोप ठेवला आहे.साजिदने मला एका चित्रपटाच्या आॅडिशनसाठी घरी बोलवले होते. बिकनीत आॅडिशन द्यावे लागेल, असे साजिदच्या मॅनेजरचा मॅसेज मला मिळाला होता. आॅडिशनच्या ठिकाणी पोहोचल्यावर मी बिकनी घातली. काहीच वेळात साजिद तिथे आला आणि सोफ्यावर बसला. यानंतर माझ्यासमोर आपली पँट खाली करून त्याने अश्लिल चाळे सुरू केलेत. तुला पाहून मीच उत्तेजित होत नाही, मग प्रेक्षक कसे होतील, असे तो मला म्हणाला. त्याचे ते रूप माझ्यासाठी धक्कादायक होते. मी इतकी घाबरले होते मी रडू लागले आणि रडत रडतचं घरी परतले, असे प्रियंकाने म्हटले आहे.
साजिदवर आत्तापर्यंत अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. सर्वप्रथम अभिनेत्री सलोनी चोप्राने साजिदवर गंभीर आरोप केलेत. यानंतर उंगली या चित्रपटाच्या अभिनेत्रीने, एका महिला पत्रकाराने शिवाय अभिनेत्री सिमरन सूरीनेही साजिदवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप ठेवला. या आरोपांमुळे साजिदला ‘हाऊसफुल 4’ हा चित्रपट हातचा गमवावा लागला.याशिवाय प्रियांका बोसने अनुराग कश्यप आणि सौमिक सेनसोबतचा अनुभवही शेअर केला. एकदा नशेत असताना अनुराग माझ्याबदद्ल अश्लिल बोलला होता. सौमिकने माझ्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवण्याची आॅफर दिली होती. शूटींगदरम्यान तो माझ्याशी ओव्हर फ्रेंडली झाला होता, असे प्रियंका बोसने म्हटले आहे.प्रियंका बोस हिने जॉनी गद्दार,गुजारिश तसेच लव, सेक्स और धोखा या चित्रपटात काम केले आहे.