Join us
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव! म्हणे, असे काही घडलेच नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 18:46 IST

 ‘किज्जी और मैनी’च्या सेटवर सुशांत संजनासोबत ‘ओव्हर फ्रेन्डली’ झाला आणि त्याच्या त्या वागण्याला कंटाळून संजना सेटवरून निघून गेली, अशी बातमी मध्यंतरी आली होती.

बॉलिवूडमध्ये जोरात असलेल्या ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत अभिनेता सुशांत सिंग राजपूतवर अभिनेत्री संजना सांघीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ‘किज्जी और मैनी’च्या सेटवर सुशांत संजनासोबत ‘ओव्हर फ्रेन्डली’ झाला आणि त्याच्या त्या वागण्याला कंटाळून संजना सेटवरून निघून गेली, अशी बातमी मध्यंतरी आली होती. या प्रकारानंतर सुशांतने संजनासोबतचे खासगी चॅट सोशल मीडियावर शेअर करून हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते.

सुशांतच्या या खुलाशानंतर लोकांना संजनाच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा होती. अखेर आज ती प्रतीक्षा संपली. आज संजनाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत, या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘मी दीर्घकाळानंतर कालच अमेरिकेहून परतले. भारतात परतल्यानंतर किज्जी और मैनीच्या सेटवरच्या अनेक निराधार बातम्या माझ्या वाचनात आल्यात. मी सांगू इच्छिते की, माझ्यासोबत सेटवर असे काहीही घडलेले नाही. माझ्या या पोस्टसोबतचं हा विषय इथेच संपवा,’ असे संजनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.एकंदर काय तर अमेरिकेहून परतल्या परतल्या संजनाने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला आहे. तिच्या या पोस्टनंतर किज्जी और मैनीचे शूटींग पुन्हा वेगात सुरू होईल आणि सुशांत सिंग राजपूतही सगळे विसरून कामाला लागेल, एवढीच अपेक्षा आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतमीटू