‘मी टू’ चळवळीमुळे बॉलिवूडमुळे खळबळ माजली आहे. अलीकडे एका माजी फ्लाईट अटेंडेटने बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला. फेसबुकवर पोस्ट शेअर करत तिने आपबीती सांगितली आणि ‘मी टू’ मोहिमेच्या यादीत आणखी एकाची भर पडली.१९९८ मध्ये कोलकात्याच्या हॉटेलात डान्स करायला नकार दिला म्हणून अभिजीत भट्टाचार्यने आपल्याला जोरात स्वत:कडे खेचले आणि बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला. तू स्वत:ला समजतेस काय, थांब मी तुला चांगला धडा शिकवतो, असे अभिजीत म्हणाल्याचे संबंधित महिलेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले. आता या संपूर्ण प्रकरणावर अभिजीत भट्टाचार्यची प्रतिक्रिया आली आहे. मुंबई मिररशी बोलताना अभिजीतने या संपूर्ण प्रकरणावर बरीच धक्कादायक प्रतिक्रिया दिली.
#Metoo: गैरवर्तनाच्या आरोपावर अभिजीत भट्टाचार्यची धक्कादायक प्रतिक्रिया! म्हणे, माय फुट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 4:44 PM