Join us  

#MeToo : माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न झाला होता...! आलियाची आई सोनी राजदान यांचा धक्कादायक खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 1:46 PM

‘मीटू’ मोहिमेअंतर्गत आता एक नवा खुलासा झाला आहे. हा खुलासा करणारी व्यक्ती दुसरी कुठली नसून आलिया भट्टची आई सोनी राजदान आहे. 

मीटू’ मोहिमेअंतर्गत आता एक नवा खुलासा झाला आहे. हा खुलासा करणारी व्यक्ती दुसरी कुठली नसून आलिया भट्टची आई सोनी राजदान आहे. होय, सोनी राजदान यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. एका चित्रपटाच्या सेटवर माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न झाला होता, असे सोनी राजदान यांनी म्हटले आहे.‘द क्विंट’ दिलेल्या मुलाखतीत सोनी यांनी आपली आपबीती सांगितली आहे. एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एका व्यक्तिने माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने मी बचावले. या घटनेबद्दल मी कधीही कुणाजवळही बोलले नाही. कारण त्या व्यक्तिचे कुटुंब मला उदध्वस्त करायचे नव्हते. त्याची लहान-लहान मुले होती. मी शांत बसले नसते तर त्याच्या कृत्याची शिक्षा त्याच्या कुटुंबाला भोगावी लागली असती. मला त्याच्या चुकीची शिक्षा त्याच्या कुटुंबाला द्यायचर नव्हती. म्हणून मी शांत बसले़ कदाचित तो काळ वेगळा होता. आजच्या घडीला अशी घटना घडली असतील तर मी नक्की आवाज उठवला असता, असे सोनी राजदान म्हणाल्या.या घटनेशिवाय सोनी राजदान यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला. आलोकनाथ यांच्यावरही त्यांनी आरोप केले. आलोक नाथ यांना मी चांगलेच ओळखते़ मद्य पोटात गेले की, त्यांचा खरा चेहरा समोर येतो. माझ्यावरही त्यांची वाईट नजर होती, असे सोनी राजदान म्हणाल्या.सोनी राजदान यांनी   अगदी अलीकडे ‘राजी’ या चित्रपटात  आलियासोबत काम केले. दूरदर्शनवरच्या ‘बुनियाद’ या मालिकेत त्यांनी सुलोचनाची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली होतह़ यानंतर साहिल, गाथा अशा अनेक मालिकांत त्या दिसल्या. २००२मध्ये त्यांनी अभिनय सोडून दिग्दर्शनात हात आजमावण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :आलिया भटमीटू