एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचविरोधात बोलणारी साऊथची हॉट अॅण्ड बोल्ड अभिनेत्री श्रुती हरिहरन हिने पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा करत आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. स्वत:ची ‘मीटू’ स्टोरी शेअर करताना श्रुतीने साऊथचा लोकप्रीय अभिनेताअर्जुन सरजा याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत.
अनेक हिट कन्नड चित्रपटांत दिसणाऱ्या श्रुती हरिहरनने ‘मीटू’ मोहिमेची पाठराखण करत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. २०१३ साली‘विस्मया’ या चित्रपटाच्या सेटवर आपल्यासोबत लैंगिक शोषण झाल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सेटवर ५० लोकांसमोर एका रोमॅन्टिक दृश्याच्या शूटींगदरम्यान त्याने माझ्याशी गैरवर्तन केले. या घटनेनंतर आपल्यावर शारिरीक आणि मानसिक आघात झाला, मात्र या परिस्थिती सावरत कशाप्रकारे या सर्वाचा सामना केला,असे सगळे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.