‘मीटू’ मोहिमेने लैंगिक शोषणाच्या, गैरवर्तनाच्या प्रकरणांना वाचा फोडली आहे. कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी आत्तापर्यंत ‘मीटू’वर आपआपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आता सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टाचे सरचिटणीस सुशांत सिंग यानेही ही लढाई यापुढे आणखी कठीण होणार आहे, असे सांगत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ‘मीटू’ मोहिमेला अधिक बळ देण्याची गरजही त्याने बोलून दाखवली आहे.‘भारतात ‘मीटू’ने मला अंतर्बाह्य हादरवून सोडले आहे. या मोहिमेने देशातील पित्तृसत्ताक संस्कृतीला मोठा धक्का दिला आहे. पण पुरूष इतक्या सहजी हार पत्करणारे नसल्याने पुढची लढाई आणखीही कठीण होणार आहे. ही विजयोत्सव साजरा करण्याची वेळ नाही. ही तर केवळ सुरूवात आहे,आता थांबू नका...’, अशा शब्दांत सुशांत सिंगने ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा दिला आहे.‘मीटू’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सुशांत सिंहने आपल्या सोशल अकाऊंटवर ‘मुझे माफ कर दो़...’अशी एक कविताही पोस्ट केली आहे.मर्द होना यूँ भी होता हैमुझे न पता थाएक दिन मैं रोता हूँहर रात सुबकता हूँमुझे माफ कर दोमुझे माफ कर दोमुझे माफ कर दोमुझे माफ कर दोअशा या कवितेच्या ओळी आहेत.तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादात सुशांत सिंगने ‘सिन्टा’च्या वतीने तनुश्रीची माफी मागितली होती. १० वर्षांपूर्वी तनुश्रीचे प्रकरण योग्यरित्या हाताळले गेले नाही, असे त्याने म्हटले होते.
#MeToo: सिन्टा सरचिटणीस सुशांत सिंग म्हणतो, ही तर सुरूवात, पुढील लढाई आणखी कठीण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 3:46 PM