Join us

मध्यरात्री सलमान खानने ऐश्वर्याच्या बिल्डिंगबाहेर केला होता राडा, असे झाले होते दोघांचे ब्रेकअप

By तेजल गावडे | Updated: November 7, 2020 12:25 IST

सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावेळी ही लोकप्रिय कपलपैकी एक होते. इतकेच नाही तर ते दोघे सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावत असत. ते दोघे लग्न करणार असे वाटत असतानाच त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आणि त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय का घेतला याबाबत त्या दोघांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले. संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सलमानसाठी तिने हम तुम्हारे है सनम या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील साकारली होती. 

ऐश्वर्या बऱ्याचदा सलमानच्या कुटुंबियांसोबत पाहायला मिळत असे. पण ऐश्वर्याच्या कुटुंबियांना तिचे सलमानसोबत असलेले नाते पसंत नव्हते. नोव्हेंबर २००१ मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या घरी जाऊन दारूच्या नशेत प्रचंड गोंधळ घातला होता. सलमानला ऐश्वर्याकडून लग्नाचे वचन हवे होते तर ऐश्वर्या लगेचच लग्न करायला तयार नव्हती. त्याने रात्री तीन वाजेपर्यंत घातलेल्या या गोंधळामुळे ऐश्वर्या प्रचंड चिडली होती. त्याने त्यावेळात ऐश्वर्याच्या वडिलांसोबत गैरवर्तुणूक केली होती असेदेखील म्हटले जाते.

सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच व्यक्तीसोबत आपण सगळ्यात जास्त भांडतो. सलमान आणि ऐश्वर्यात वाद सुरू असतानाच ऐश्वर्याला काहीही न सांगता सलमान त्याची पूर्वप्रेयसी सोमी अलीला मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला आणि त्याच कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले असे इंडिया टूडेने त्यांच्या वृत्तात म्हटले होते.

टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चन