Join us

मीका सिंहचा ड्रामा क्वीन कंगनाला सल्ला, 'अ‍ॅक्टिंग कर, इतकी देशभक्त कधीपासून जागी झाली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 09:18 IST

आता गायक मीका सिंहने कंगना रनौतला एक सल्ला दिला आहे. कंगनाकडून सतत सोशल मीडियावर होत असलेल्या सततच्या बयानबाजीमुळे मीका हैराण झाला आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने जेव्हापासून शेतकरी आंदोलनावर ट्विट करणं सुरू केलं तेव्हापासून ती वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल होते आहे. आधी तर केवळ कंगना आणि अभिनेता दिलजीत दोसांझमध्ये वाद सुरू झाला होता. आता यात अनेक सेलिब्रिटी आले आहेत. अनेकजण कंगनाच्या वक्तव्याचा विरोध करत आहे आणि तिला भाषेवर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहेत. 

मीका सिंहचा कंगनाला सल्ला

आता गायक मीका सिंहने कंगना रनौतला एक सल्ला दिला आहे. कंगनाकडून सतत सोशल मीडियावर होत असलेल्या सततच्या बयानबाजीमुळे मीका हैराण झाला आहे. त्याच्यानुसार, कंगनाने केवळ आणि केवळ अभिनय करण्याचं काम करावं. याबाबत त्याने लिहिले की, 'बेटा तुझं टार्गेट काय आहे, हे काही समजत नाही. तू खूप हुशार-सुंदर मुलगी आहेस. अभिनय कर ना यार, अचानक इतकी देशभक्ती तीही ट्विटर आणि न्यूजमध्ये'.

मीकाने आणखी एका ट्विटमधून कंगना रनौतला वायफळ बडबड करण्याऐवजी काही चांगलं काम करण्याचा सल्ला दिला आहे. मीकानुसार, त्याची टीम रोज ५ लाख लोकांना जेवण पुरवत आहे. तो म्हणाला की, जर कंगनाने २० लोकांनाही जेवण दिलं तरी मोठी गोष्ट होईल. मीका जोर देत म्हणाला की, सोशल मीडियावर शेरनी होणं सोपं आहे, पण तसं काम करणं कठिण.

कंगना संतापली

मीकाकडून हे ट्विट करण्यात आले होते तेव्हा कंगना म्हणाली होती की, प्रत्येकजण तिला टार्गेट करत आहे. प्रत्येकजण तिच्या विरोधात केस करत आहे. कंगनाने लिहिले होते की, 'फिल्म माफियाने माझ्या विरोधात अनेक केसेस केल्या आहेत. काल रात्री जावेद अख्तरने एक केस केली आहे. महाराष्ट्र सरकार एक केस फाइल करत आहे. मला वाटतं हे सगळे मला महान बनवून सोडणार. आता कंगनाचे हे आधीचे ट्विट व्हायरल झाल्यावर त्यावर मीका सिंहने कंगनाला सल्ला दिला आहे.

टॅग्स :मिका सिंगकंगना राणौतबॉलिवूड