बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या चर्चेत आहे. १६ जानेवारी रोजी एक चोरा त्याच्या घरात घुसला आणि सैफवर चाकूने सहा वेळा वार केले. ज्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. सैफची प्रकृती आता सुधारली आहे आणि तो लीलावती रुग्णालयातून घरी परतला आहे. त्यानंतर आता सैफने त्याचा जीव वाचवणाऱ्या रिक्षा चालकाची भेट झाली. याच दरम्यान मिका सिंहने त्या रिक्षा चालकाचं कौतुक केलं आहे.
रिक्षा चालकाला १ लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्याची माहिती मागितली आहे. मंगळवारी सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर अभिनेत्याने रिक्षा चालक भजन सिंह राणाची भेट घेतली. भजन आणि सैफच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
मिका सिंहने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात म्हटलं आहे की, भजन सिंहला ११ लाख रुपये मिळायला हवेत. "भारताच्या आवडत्या सुपरस्टारचा जीव वाचवल्याबद्दल तो किमान ११ लाख रुपयांच्या बक्षिसास पात्र आहे असं मला वाटतं. त्याचं काम खरोखरच कौतुकास्पद आहे. शक्य असल्यास कृपया त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स माझ्यासोबत शेअर करा. मी त्याला १ लाख रुपये देऊ इच्छितो" असं म्हटलं आहे.
मिका सिंहने सैफ अली खानने रिक्षा चालकाला ५१ हजार रुपये देत असल्याची पोस्टही शेअर केली आहे. त्याने सैफला आवाहन केलं, सैफ भाई कृपया त्याला ११ लाख रुपये द्या. तो खरा हिरो आहे. मुंबईचा रिक्षावाला जिंदाबाद. मिकाची ही पोस्ट आता व्हायरल होत आहे. अभिनेता सैफ अली खानने भेटीदरम्यान भजन सिंहचं कौतुक केलं होतं.